Prakash Solanke esakal
मराठवाडा

आमदार सोळंके संतापले! म्हणाले, मुंडेंना पुन्हा एकदा जेलमध्ये घालणार

राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी वडवणी नगरपंचायतीची निवडणुक प्रतिष्ठेची केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

बीड : जिल्ह्यातील पाच नगरपंचायतींच्या निवडणुकांचा प्रचार हायव्होल्टेज टप्प्यावर पोचला आहे. आता जेल, ईडी, दहशत असे मुद्दे प्रचारात आले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांनी वडवणी नगरपंचायतीची निवडणुक प्रतिष्ठेची केली आहे. सोळंके यांना ईडीकडून (सक्तवसूली संचालनालय) चौकशीचे आव्हान देणाऱ्या भाजपच्या राजाभाऊ मुंडे यांनाच पुन्हा एकदा जेलमध्ये घालणार असे खुले आव्हान आता सोळंके यांनी दिले (Beed) आहे.निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आक्रमक प्रचार सुरु झाला आहे. माजलगाव मतदारसंघातील वडवणी नगरपंचायत (Wadavani Municipal Council) भाजपच्या (BJP) ताब्यात आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ मुंडे यांच्या पत्नी मंगला मुंडे नगराध्यक्षा होत्या. या नगरपंचायतीमध्ये सत्तांतर करण्यासाठी राष्ट्रवादीचे (NCP) आमदार सोळंके यांनी चंग बांधला आहे. (MLA Prakash Solanke Warn Rajabhau Munde To Be Jail Once Again Beed Latest News)

सोळंके व पुतणे सभापती जयसिंह सोळंके वडवणीत तळ ठोकून असून त्यांनी भाजपचे माजी आमदार केशव आंधळे यांनाही आपल्या गोटात घेतले आहे. दरम्यान, एका सभेत राजाभाऊ मुंडे यांनी प्रकाश सोळंके यांची ईडीकडून चौकशी लावण्याचे आव्हान दिले. त्यानंतर सभेत प्रकाश सोळंके चांगलेच संतापले. ईडी लाव नाही तर काडी लाव पण राजाभाऊ मुंडेला जेलची हवाच खायला लावणार असा इशारा दिला. यापूर्वी जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात दोन वर्षे फरार आणि दीड वर्षे जेलमध्ये राहीलेल्या मुंडेला पुन्हा एकदा वडवणी नगरपंचायत भ्रष्टाचार प्रकरणात जेलमध्येच घालणार. वडवणी नगरपंचायतीचे लेखा परीक्षण अहवाल आपल्या हाती आले असून यात अनेक गंभीर अक्षेप नोंदविल्याचेही प्रकाश सोळंके म्हणाले.

आपण ४०० कोटींचा निधी मिळवून केलेल्या कुंडलिका धरणावरुन वडवणीला पाणी मिळते, आणि आपल्याला विचारले जाते विकास काय केला. अरे, लायकी तरी आहे का मी काय केले हे विचारायची, कुंडलिका धरणात बुडवू असाही संताप सोळंके यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT