Rajiv satav 
मराठवाडा

`मम्मी पप्पांना चटके बसत आहेत`, अंत्यसंस्कारात सातव यांच्या चिमुकलीचा आक्रोश

राज्यसभेचे खासदार तथा गुजरात प्रभारी अॅड. राजीव सातव यांचे उपचारा दरम्यान पुण्यात निधन झाल्यानंतर सोमवार (ता. १७) ला त्यांच्यावर कळमनुरी येथील त्यांच्या निवासस्थानासमोर असलेल्या मोकळ्या जागेत अंत्यसंस्कार करण्यात आले.

संजय कापसे

कळमनुरी ( जिल्हा हिंगोली ) : राज्यसभेचे खासदार अॅड. राजीव सातव (Rajiv satav) यांच्यावर सोमवार (ता. १७) ला अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या दहा वर्षीय मुलीने चितेला अग्नी देताच मम्मी पप्पाला चटके बसत आहेत अस म्हणत अश्रूंना वाट मोकळी करुन दिली त्या चिमुकलीचे वाक्य ऐकूण अनेकांचे मन हेलावून गेली. (rajiv satav funeral)

राज्यसभेचे खासदार तथा गुजरात प्रभारी अॅड. राजीव सातव यांचे उपचारा दरम्यान पुण्यात निधन झाल्यानंतर सोमवार (ता. १७) ला त्यांच्यावर कळमनुरी येथील त्यांच्या निवासस्थानासमोर असलेल्या मोकळ्या जागेत अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी त्यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. कळमनुरी व हिंगोली लोकसभा मतदार संघाप्रमाणेच राज्यातील विविध पक्षाचे नेते पदाधिकारी, मंत्री, आमदार, खासदार यांची उपस्थिती होती. राज्याबाहेरुन ही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते.

हेही वाचा - तीस वर्षांपासून हातावरील शेवया करणाऱ्या कमलबाई; स्वतःच्या घराचेही स्वप्न पूर्ण

यावेळी राजीव सातव यांनी मागील काही काळात जोडलेल्या राजकारणातील व सर्वसामान्य नागरिकांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी सकाळी सात वाजल्यापासून रांगेत शिस्तीने आपल्या आवडीच्या नेत्याचे शेवटचे अंत्यदर्शन घेत अंत्यसंस्काराला उपस्थिती लावली. श्री सातव यांच्या पार्थिवाजवळ त्यांच्या आई माजी मंत्री रजनी सातव, पत्नी डॉ. प्रज्ञा सातव, मुलगा पुष्कराज, व मुलगी, मामा प्रताप वाघ, प्राचार्य डॉ. बबन पवार यांच्यासह निकटवर्तीय नातेवाईकांची उपस्थिती होती. यावेळी दहा वर्षीय मुलीने पूर्ण वेळ पार्थिवाजवळ बसून शोक मग्न असलेल्या आपल्या आईला धीर देण्याचे काम करत शव मधील आपल्या पप्पाचा चेहरा बघत असल्याचे चित्र पार्थिवाचे अंत्यदर्शन घेणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे मन सुन्न करुन गेले. त्यानंतर अंत्यसंस्कार वेळी मुलगा पुष्कराज सातव यांने चितेला अग्नी देताच श्री सातव यांच्या मुलीने मम्मी पप्पाला चटके बसताहेत असं म्हणून अश्रूंना वाट मोकळी करुन देत मुलीच्या या एका वाक्याने उपस्थितांची मने हेलावून गेली.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT