file photo
file photo 
मराठवाडा

जालना औद्योगिक वसाहतीमध्ये भरदिवसा लुटमारी

उमेश वाघमारे

जालना -  औद्योगिक वसाहत येथील शक्ती इलेक्‍ट्रॉन मिच्या गेटवर चार हल्लेखोरांनी एका उद्योजकाच्या मुनिमावर हल्ला करून तब्बल सात लाख ८० हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे. ही घटना बुधवारी (ता. १९) भरदुपारी घडली. दरम्यान, मुनीम आलम पठाण यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

उद्योजक विशाल दाड हे आपले मुनीम आलम पठाण यांच्यासह बुधवारी (ता. १९) दुपारी राहत्या घरून सात लाख ८० हजार रुपयांची रोकड कारमधून कंपनीत घेऊन निघाले होते. विशाल दाड यांच्या शक्ती इलेक्‍ट्रॉन मिलच्या गेटवर कार आल्यानंतर विशाल दाड हे मिलमध्ये गेले. त्यानंतर त्यांचे मुनीम आलम पठाण हे कारमधून रोकडची बॅग घेऊन मिलमध्ये जात असताना दबा धरून बसलेल्या चार दरोडेखोरांनी त्यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला आणि त्यांच्याकडील सात लाख ८० हजार रुपयांची रोकड असलेली बॅग लंपास केली. दरम्यान, या हल्ल्यात आलम पठाण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर, ‘एडीएस’चे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव, चंदनझिरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्‍यामसुंदर कौठाळे यांनी रुग्णालयात धाव घेऊन जखमी आलम पठाण यांच्यासह उद्योजक विशाल दाड यांची चौकशी करून घटनेची माहिती घेतली.

गेटवर सुरक्षारक्षक नाही

शक्ती इलेक्‍ट्रॉन मिलच्या गेटवर हा लुटमारीचा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे या मिलच्या गेटवर साधा एक सुरक्षारक्षक देखील नव्हता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sambit Patra: 'भाजप नेते मोदींना देवाच्या वरती समजू लागले'; संबित पात्रांच्या वक्तव्यामुळे विरोधकांना आयता मुद्दा

Pune Porsche Accident: पुण्यात दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाचे वडिल पोलिसांच्या ताब्यात; संभाजीनगरमधून केले अटक

Rava Dosa Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा चवदार रवा डोसा, जाणून घ्या सोपी रेसिपी

Yoga Tips : थकवा अन् अशक्तपणापासून आराम मिळवण्यासाठी दररोज करा 'ही' योगासने, जाणून घ्या सरावाची पद्धत

Latest Marathi News Live Update: गजानन महाराजांच्या पालखीलचे 13 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान

SCROLL FOR NEXT