Marathwada Industry News 
मराठवाडा

मराठवाड्यात चार हजारांवर उद्योग सुरू, दीड लाख कामगारांना काम

हरी तुगावकर

लातूर : कोरोनाच्या अनलॉक-वनमध्ये अनेक शिथिलता मिळाल्या असल्या तरी मराठवाड्यातील उद्योगांच्या चाकाला म्हणावी तशी गती मिळालेली नाही. अद्याप अडीच हजार उद्योगांचे लॉकडाउनच आहे. सुरू झालेल्या उद्योगांपुढे कच्च्या मालाच्या प्रश्नासोबतच तयार झालेल्या मालाच्या विक्रीचा प्रश्न आहे. परराज्यांतील हजारो कामगारांनी गाव जवळ केल्याने उद्योजकांना कामगारांचा प्रश्न भेडसावत आहे. आतापर्यंत चार हजार १३२ उद्योग सुरू झाले असून दीड लाख कामगारांच्या हाताला काम मिळाले आहे.


चौथ्या लॉकडाउनपासून उद्योगांसाठी शासनाने शिथिलता दिली. त्यात अनलॉक-वनमध्ये तर परवानगी घेण्याची अटही रद्द केली. शासनाने उद्योग सुरू करण्यासंदर्भात शिथिलता दिली असली तरी उद्योगांसमोरच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत. मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणाहून कच्चा माल आणण्याची तसेच तयार झालेला माल विकण्याची अडचण कायम आहे.

मराठवाड्यातील उद्योगांत परराज्यांतील हजारो कामगार कार्यरत आहेत. बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश आदी राज्यांतील कामगारांची काम करण्याची क्षमता मोठी आहे. अशा कामगारांनी कोरोनामुळे गाव जवळ केले आहे. ते लगेचच परततील किंवा कसे याबाबत साशंकता आहे. स्थानिकांना रोजगार मिळेल ही समाधानाची बाब असली तरी प्रक्रिया पूर्णत्वासाठी काही कालावधी लागू शकतो.

लॉकडाउन शिथिलतेनंतरची स्थिती
मराठवाड्यात एमआयडीसीच्या हद्दीत लॉकडाउनपूर्वी सहा हजार १६१ उद्योग सुरू होते. लॉकडाउनमध्ये शिथिलता मिळाल्यांतर त्यापैकी चार हजार १३२ उद्योग सुरू झाले आहेत. दोन हजार ४२१ उद्योगांचे शटर बंदच आहे. कोरोनाने त्रस्त असलेल्या औरंगाबादमधील बाराशे उद्योग सुरू होऊ शकले नाहीत. जालन्यात स्टील उद्योगही पूर्ण क्षमतेने सुरू झालेला नाही. लातूरमध्ये पन्नास टक्के उद्योगांची चाके फिरू लागली आहेत. यात कृषी प्रक्रिया उद्योगाने वेग घेतला आहे. नांदेडमध्ये उद्योग सुरू झाले आहेत. अडचणी दूर करून त्यांना चालना देण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे.


काम मिळालेल्या कामगारांची संख्‍या
मराठवाड्यातील एमआयडीसीमध्ये काही उद्योग सुरू झाले आहेत. त्यामुळे गेल्या तीन-चार महिन्यांपासून घरी बसलेल्या सुमारे एक लाख ५५ हजार ७३ कामगारांच्या हाताला काम मिळाले आहे. यात औरंगाबाद- एक लाख ४५ हजार १९३, जालना- तीन हजार ५८७, बीड- १४६, लातूर- दोन हजार ३६७, उस्मानाबाद- ७३८, नांदेड - दोन हजार १०२, परभणी- ४०३, तर हिंगोलीमध्ये ५३७ कामगारांच्या हाताला काम मिळाले आहे.


अनलॉक-वनमध्ये साठ ते सत्तर टक्के उद्योग सुरू झाले आहेत. कच्चा माल आणणे आणि पक्का माल विकण्यातील साखळी सुरळीत झालेली नाही. डीलर, सबडीलर यांचीही साखळी तुटली आहे. कामगारांचा प्रश्न भेडसावत आहे. उद्योगांना ट्रॅकवर येण्यासाठी काही दिवस लागतील. स्थानिकांना रोजगाराची संधी देण्याचा प्रयत्न सुरू आहे. एमआयडीसीच्या माध्यमातून लवकरच महाराष्ट्र कामगार ब्युरो साईट सुरू होत आहे. यातून स्थानिकांना काम मिळेल.
- महेश मेघमाळे, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी, लातूर.

एमआयडीसी हद्दीतील उद्योगांची स्थिती
--------------
जिल्हा---  लॉकडाउनपूर्वी सुरू उद्योग----------आता सुरू उद्योग------बंद  उद्योग
औरंगाबाद----४४३३-------------------------------३१४८--------------------------१२८५
लातूर----------९५१-------------------------------४७८-------------------------------४७३
जालना---------५१३------------------------------७८---------------------------------४३५
नांदेड-----------२२८-----------------------------२१४--------------------------------१४
उस्मानाबाद------१४६-------------------------८५-----------------------------------६१
परभणी----------१४०--------------------------५३-----------------------------------८७
बीड-------------७६-----------------------------४०-----------------------------------३६
हिंगोली----------६६----------------------------३६----------------------------------३०
--------------------------------------------------------------------------------------------
एकूण----------६५५३-----------------------४१३२---------------------------------२४२१
-----------------------------------------------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT