मराठवाडा

स्वतःच्या वाढदिवशीच मुलीचा खून करून आईची आत्महत्या

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - स्वत:च्या वाढदिवशीच साडेतीन वर्षीय मुलीचा साडीने गळफास देत आईनेही आत्महत्या केली. प्राथमिक माहिती व परिस्थितीजन्य बाबींवरून ही बाब समोर आली. बेगमपुऱ्यातील ही घटना रविवारी (ता. १७) सायंकाळी पाचनंतर उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, अमृता किशोर मुळे (वय २२) असे आईचे व अवंतिका किशोर मुळे (रा. चावलगेट, बेगमपुरा) असे मुलीचे नाव आहे. अमृताचे माहेर केज (जि. बीड) असून, पाच वर्षांपूर्वी विवाह झाला होता. रविवारी दुपारी दोघीही घरात होत्या. जेवण करून अमृता मुलीला घेऊन दुसऱ्या मजल्यावर झोपण्यासाठी गेली. तेथील खोलीत आतून दरवाजा बंद करून तिने साडीच्या साह्याने अवंतिकाला फास दिला. ती मृत झाल्यानंतर अमृताने स्वत:  गळफास लावून आत्महत्या  केली. बराच वेळ झाला; परंतु दोघींचा आवाज न आल्याने सायंकाळी सव्वापाचला दुसऱ्या मजल्यावर आलेल्या किशोर मुळे यांनी खोलीचा दरवाजा ठोठावला; परंतु आतून प्रतिसाद आला नाही. त्यामुळे तेही घाबरले. त्यांनी दरवाजा तोडल्यानंतर दोघी मृतावस्थेत आढळल्या. हे दृश्‍य पाहून किशोर यांचा थरकाप उडाला. दरम्यान, दोघींना नागरिक व पोलिसांच्या मदतीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची तूर्तास बेगमपुरा पोलिस ठाण्यात नोंद झाली. 

सासरे सहायक फौजदार
अमृताचे सासरे दिलीप मुळे हे शहर पोलिस दलात सहायक फौजदार असून, नियंत्रण कक्षात नोकरीला आहेत. पती किशोर मुळे चालक आहेत. त्यांना एक वाहनही खरेदी करून देण्यात आले होते; परंतु त्यात यश न आल्याने ते बेगमपुऱ्यातील पार्किंगमध्ये काम करीत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: आम्ही काम करतो, इतरांसारख खोट बोलत नाही, अजित पवारांची सुप्रिया सुळेंवर टीका

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT