latur
latur 
मराठवाडा

लातूर : कंत्राटदाराच्या कामावर महापालिकेची यंत्रणा

हरी तुगावकर

लातूर : येथील शिवाजी चौक ते रेणापूर नाका या मार्गावर राष्ट्रीय महामार्गाच्या वतीने काम सुरु आहे. एका कंत्राटदाराला हे काम देण्यात आले
आहे. पण गेल्या सात दिवसापासून या कंत्राटदाराच्या कामावर महापालिकेची यंत्रणा कार्यरत आहे. टिप्पर, बॉपकॅट मशीनसह सात मजूर, दोन ड्रायव्हर हे या कामावर कार्यरत असल्याचा प्रकार मंगळवारी (ता. २०) उघडकीस आला.

महापालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते अॅड. दीपक सूळ यांनी तातडीने
घटनास्थळी भेट देवून हे काम थांबवले आहे. येथील शिवाजी चौक ते रेणापूर नाका या रस्त्यावर दोन्ही बाजूने हॉटमिक्सचे काम करण्यात येत आहे. सात ते आठ कोटीचे हे काम आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या वतीने एका कंत्राटदाराला हे काम देण्यात आले आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साईडपट्टयासह हे काम देण्यात आले आहे. यात कंत्राटदाराचीच सर्व यंत्रणा राबविणे आवश्यक आहे. पण तसे न करता कंत्राटदारांने चक्क महापालिकेच्या संबंधीतांना हाताशी धरून महापालिकेचीच यंत्रणा राबवली आहे. साईडपट्टया खोदून त्या व्यवस्थित करण्यासाठी ही यंत्रणा वापरण्यात आली आहे. गेली सात दिवस सर्वांच्या डोळ्यादेखत ही यंत्रणा रस्त्यावर काम करीत आहे. तरी देखील महापालिकेच्या कोणत्याही पदाधिकारी किंवा अधिकाऱयांनी जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. या कामावर महापालिकेचे एक टिप्पर, बॉपकॅट मशीनसह सात मजूर दोन ड्रॅव्हर कामावर आहेत. यामशीनला महापालिकेचेच डिझेलचा वापर करण्यात येवून महापालिकेला
चूना लावण्यात आला आहे.

या प्रकाराची माहिती मिळताच मंगळवारी महापालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते अॅड. दीपक सूळ यांनी कामाला भेट देवून कामगारांची हजेरी घेत हे कामच बंद पाडले. दोन तास ते कामाच्या ठिकाणी थांबून होते. पण एकही पदाधिकारी किंवा अधिकारी या कामाकडे फिरकलाही नाही. कंत्राटदाराचा एक सुपरवायझर मात्र तातडीने तेथे आला. त्यानेही महापालिकेच्या यंत्रणेकडून आम्ही काम करून घेत आहोत याची कबुलीही त्यांनी दिली. यावर महापालिकेचे आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर काय कारवाई करणार याकडे आता लक्ष लागले आहे.

महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. कर्मचाऱय़ांच्या पगारी वेळेवर होत नाहीत. येथे मात्र राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर महापालिकेची यंत्रणा
राबवली जात आहे. सत्ताधाऱय़ाच्या जवळचा हा कंत्राटदार आहे. त्याचा फटका मात्र महापालिकेला बसत आहे. संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे.
- अॅड. दीपक सूळ, विरोधी पक्ष नेता, महापालिका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

SCROLL FOR NEXT