file photo
file photo 
मराठवाडा

परभणी ; लहान मुलांच्या भांडणात 40 वर्षीय इसमाचा खून

गणेश पांडे

परभणी : शहरातील गौस  कॉलनी भागात लहान मुलांच्या भांडणावरुन एका चाळीस वर्षीय व्यक्तीचा बेदम मारहाण करुन खून करण्यात आल्याची घटना शनिवारी (ता. ३०) जानेवारी रोजी रात्री ८.३० च्या सुमारास घडली. याप्रकरणी कोतवाली पोलिसात दहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमद खान सलीम खान (रा. गौस कॉलनी दर्गा रोड परभणी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून आरोपी सय्यद नकिद, सय्यद मोईन, सय्यद मोईन, हाश्मी, सय्यद अब्दुल रहमान, सय्यद जिलानी, सय्यद अब्दुल इब्राहीम व इतर दोन ते तीन अनोळखी इसम (रा. परभणी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.                   

ता.३० जानेवारी रोजी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास अहमद खान यांच्या राहत्या घरी गौस कॉलनी दर्गा रोड परभणी येेथे ही घटना घडली.

ता.३१ जानेवारी रोजी सकाळी गुन्हा दाखल झाला.

यातील नमूद आरोपिंनी गैर कायद्याची मंडळी जमवून दुपारी झालेल्या लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून अहमद खान यांच्यात पत्नी, आई व बहीण यांना शिवीगाळ करून मारहाण केली. जीवे मारण्याच्या उद्देशाने लाकडी काठ्या दगड व लोखंडी रॉडने अहमद खान व त्यांचे नातेवाईक यांना मारहाण केली. त्यात अहमद खान यांचे भाऊ माजित खान यांना डोक्यावर जबर मारहाण झाल्याने ते जखमी झाल्याने त्यांना सरकारी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत्यू झाला आहे असे घोषित केले. त्यांचा मृत्यू हा आरोपींतांनी मारहाण केल्यामुळे झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT