Murder
Murder 
मराठवाडा

व्हॉट्‌सॲप चॅटच्या वादातून खून

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - व्हॉट्‌सॲप ग्रुपवर चाललेल्या चॅटवरून वाद भडकला आणि प्लॉटिंग व्यावसायिक तरुणावर टोळक्‍याने सशस्त्र हल्ला चढवून त्याचा भोसकून खून केला. ही घटना रविवारी (ता. १४) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हर्सूलच्या फातेमानगरमध्ये घडली. 

मोईन मेहमूद पठाण (वय ३५, रा. पटेलनगर, जामा मशिदीजवळ, हर्सूल) असे मृताचे नाव आहे. त्याला काही जणांनी दुपारी चारच्या सुमारास दुचाकीवर बसवून नेले. फातेमानगरातील सीमा दूध डेअरीजवळ दुचाकीवरून खाली पाडून विविध कार्यकारी सोसायटीचा चेअरमन असलेला शेखलाल रसूल पटेल (वय ३८), बाबा रहीम ऊर्फ बाबा पटेल (वय ४८) आणि बाबा नूर पटेल यांनी त्याच्यावर दगड, तलवार, चाकू आणि लाकडी दांडक्‍यांनी हल्ला चढवला. ‘व्हॉट्‌सॲप ग्रुपवर आमच्या विरोधात मेसेज का टाकतो? प्लॉटिंगच्या व्यवसायातून तू माघार घे,’ असे म्हणत या टोळक्‍याने त्याला जबर मारहाण केली.

मोईनचा भाचा इरफान शेख रहीम (वय २४, रा. बेरीबाग) हा वाचविण्यासाठी गेला असता, त्यालाही मारहाण करण्यात आली. त्याच्या डोक्‍याला जबर दुखापत झाली.

खुलेआम हल्लेखोरी
भररस्त्यात हा प्रकार खुलेआम सुरू होता. रक्ताच्या थारोळ्यात दोघांना तसेच टाकून गुंड शांतपणे निघून गेले. त्यांच्या दहशतीमुळे या भांडणात कोणीही मध्यस्थीसाठी धजावले नाही. दरम्यान, परिसरातील तरुणांनी गंभीर जखमी मोईनला तत्काळ घाटीत नेले. तोवर पोलिसांना या घटनेची माहिती नव्हती. नागरिकांनी माहिती दिल्यानंतर हर्सूलचे पोलिस निरीक्षक मनीष कल्याणकर सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; कित्येक दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये होणार कैद

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT