औंढा नागनाथ (जि.हिंगोली) : बारा ज्योतिर्लिंगामध्ये आठव्या स्थानावर असलेले तीर्थक्षेत्र नागनाथाचे ज्योतिर्लिंग असून या ठिकाणी वर्षातील नागपंचमी निमित्ताने शुक्रवारी (ता.१३) नागनाथाची पूजा करण्यात आली. सकाळ
मराठवाडा

औंढ्यात नागपंचमीनिमित्त नागनाथाची नागरुपात पूजा

दत्तात्रय शेगूकर

औंढा नागनाथ (जि.हिंगोली) : बारा ज्योतिर्लिंगामध्ये आठव्या स्थानावर असलेले तीर्थक्षेत्र नागनाथाचे ज्योतिर्लिंग (Nagnath Jyotirling) असून या ठिकाणी वर्षातील नागपंचमी निमित्ताने शुक्रवारी (ता.१३) नागनाथाची पूजा करण्यात आली. त्यानंतर भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर बंद ठेवण्यात आले. मात्र पायरीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. नागनाथ मंदिरात महाशिवरात्र, श्रावण मासातील श्रावण (Shravan) सोमवार या दिवशी वार्षिक यात्रा भरत असते. त्या निमित्ताने देवाला विविध (Aundha Nagnath) अलंकारांने सजविण्यात येते. त्या दिवशी मंदिर परिसरात देवाचे दर्शन घेण्यासाठी हजारो लाखो भाविक गर्दी करत असतात आणि त्यामुळे मंदिर भाविकांच्या गर्दीने (Hingoli) फुलून जाते. ज्योतिर्लिंग नागनाथ सगळ्यांची मनोकामना पूर्ण करत असतं अशी श्रद्धा या ठिकाणी भाविकांची आहे. परंतु गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे (Corona) संकटामुळे भाविकांना दर्शनासाठी मंदिर बंद आहे. त्यातच शुक्रवारी नागपंचमी (Nagpanchami) सणानिमित्त भाविक नागनाथ मंदिर परिसरामध्ये येऊन नागनाथ मंदिराच्या (Nagnath Temple) पायरीचे दर्शन रांगेतून घेतले.

या ठिकाणी नागरूपामध्ये देवाची पूजा मांडली जाते. यात्रा नसल्यामुळे जवळपास ५० लाख रुपयांची होणारी उलाढाल यावर्षी झाली नाही. यात्रेमुळे विविध वस्तू विक्री, प्रसाद, धार्मिक साहित्य, बेलफुल, पुष्पहार आदी विक्रेत्यांचे व्यवहार ठप्प होते. मंदिर बंद असल्यामुळे श्री.नागनाथ मंदिरात शुकशुकाट होता. दरम्यान, नागपंचमीनिमित्त येथे असलेल्या आदी नागनाथ महादेवाच्या दर्शनासाठी सकाळपासून भाविक आले होते. यावेळी आदी नागनाथ महादेवाचे मनोभावे दर्शन भाविकांनी घेतले असून या जगावरचे कोरोनाचे संकट जाऊ दे!, अशी प्रार्थना या ठिकाणी भाविकांनी केली. तसेच आदी नागनाथ देवाच्या मंदिर परिसरामध्ये पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुख्य नागनाथाच्या मंदिराचे प्रवेशद्वारवरच आदी नागनाथाचे दर्शन घेऊन भाविकांनी नागपंचमी साजरी केली. तसेच महिला वर्गाने वारुळाची पूजा केली व नागपंचमी निमित्त झोका खेळण्याचा आनंद ही बच्चेकंपनीने घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT