file photo
file photo 
मराठवाडा

नांदेडला पुन्हा महिला राज

अभय कुळकजाईकर

नांदेड :  नांदेड वाघाळा महापालिकेचे महापौरपद इतर मागासवर्गीय महिलांसाठी (ओबीसी) राखीव झाल्याने पुन्हा महापालिकेत महिलाराज येणार आहे. सलग तिसऱ्यांदा महापौरपद महिलांसाठी राखीव झाले आहे.

मुंबईला मंत्रालयात बुधवारी (ता. १३) दुपारी तीन वाजता महापौर आरक्षणाची सोडत काढण्यात आली. त्यामध्ये नांदेड महापालिकेचे महापौरपद इतर मागासवर्गीय महिलेसाठी राखीव झाले आहे. यापूर्वी २०१५ मध्ये महिला खुल्या वर्गासाठी व त्यानंतर २०१७ मध्ये अनुसुचित जाती (एससी) महिलांसाठी राखीव होते आता तिसऱ्यांदा इतर मागासवर्गीय महिलेसाठी हे पद राखीव झाले आहे.

आता या पदासाठी महापालिकेत कॉंग्रेसकडून ११ महिला दावेदार आहेत. त्याचबरोबर भाजपकडून एक महिला दावेदार आहे. मात्र, महापालिकेत कॉँग्रेसला स्पष्ट आणि जंबो बहुमत असल्यामुळे कॉँग्रेसचाच महापौर होणार असून त्यासाठी ११ महिला आहेत. या अकरा पैकी एका महिलेची निवड होणार असून अंतिम निर्णय माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे घेतील.  

कॉँग्रेसच्या या महिला दावेदार...
कॉंग्रेसच्या ११ महिला दावेदार असून त्यामध्ये सुनंदा सुभाष पाटील (तरोडा - एक ब), संगीता सखाराम तुप्पेकर (तरोडा - दोन ब), कौशल्य शंकर पुरी (सांगवी - तीन ब), शैलजा किशोर स्वामी (हनुमानगड - चार क), जयश्री निलेश पावडे (भाग्यनगर - पाच ब) मोहिनी विजय येवनकर (शिवाजीनगर - आठ ब), अलका जगदीश शहाणे (दत्तनगर टाऊन मार्केट - दहा ब), आसिया बेगम अब्दुल हबीब (हैदरबाद - ११ ब), रेहाना चांदपाशा कुरेशी (मदिनानगर - १३ ब), मंगला गजानन देशमुख (सिडको हडको २० क) यांचा समावेश आहे. त्याशिवाय प्रभा ईश्वरलाल यादव या ओबीसी (इतर मागावसवर्ग) गटातील महिला सर्वसाधारण प्रवर्गातून (वजिराबाद प्रभाग) निवडून आल्या आहेत. त्याचबरोबर शैलजा स्वामी यांना २०१५ मध्ये महापौरपद मिळाले आहे तर शिक्षण, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती म्हणून संगीता तुप्पेकर तर उपसभापती म्हणून अलका शहाणे यांना २०१७ मध्ये संधी मिळाली आहे. शांता संभाजी गोरे (वसरणी कौठा - १९ क) या भाजपकडून निवडून आल्या आहेत.

१९९७ पासून आत्तापर्यंतचे महापौर
सुधाकर पांढरे (शिवसेना - १९९७), मंगला निमकर (कॉँग्रेस - १९९८), गंगाधर मोरे (कॉँग्रेस - १९९९), ओमप्रकाश पोकर्णा (कॉँग्रेस -२००२), शमीम बेगम अब्दुल हफीज (कॉँग्रेस - २००५), बलवंतसिंग गाडीवाले (कॉँग्रेस - २००७), प्रकाश मुथा (कॉँग्रेस -२००९), अजयसिंह बिसेन (कॉँग्रेस - २०१०), अब्दुल सत्तार (कॉँग्रेस - २०१२), शैलजा स्वामी (कॉँग्रेस - २०१५), शीला भवरे (कॉँग्रेस - २०१७), दीक्षा धबाले (कॉँग्रेस -२०१९) आता ता. २८ एप्रिल २०२० मध्ये महापौरपदाची मुदत संपत असून त्यानंतर ओबीसी महिला सदस्या महापौर होणार आहे.
----

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT