नांदेडला काँग्रेसच्या वतीने सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले.
नांदेडला काँग्रेसच्या वतीने सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले. 
मराठवाडा

नांदेडला केंद्र सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसचे धरणे

अभय कुळकजाईकर

नांदेड - भारत देशाचा आत्मा हा संविधान आहे. त्यामुळे संविधानाला बदलण्याचा प्रयत्न भाजप आणि मोदी सरकारने करु नये. देशाच्या संविधानाला धक्का लावाल तर कॉँग्रेसचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरुन आंदोलन केल्याशिवाय राहणार आहे. भाजप सरकारला विरोध हेच आता देशप्रेम असल्याचे मत माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत यांनी व्यक्त केले. 

केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या भाजप सरकार व भाजपची मातृसंस्‍था आरएसएसने देशातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांचे आरक्षण रद्द करण्याचा घाट घातला आहे. न्यायालयामध्ये केंद्र शासनाने वारंवार आरक्षणविरोधात भूमिका घेतली आहे. याच्या निषेधार्थ नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस समितीच्यावतीने सोमवारी (ता. २४) सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलने करण्यात आले. त्यावेळी श्री. सावंत बोलत होते.

आरक्षणापासून वंचित ठेवले
केंद्रामधील भाजप सरकारने वारंवार राज्‍यघटनेविरोधी भूमिका घेतली आहे. राज्‍यघटनेने आरक्षणाचा दिलेला हक्क हा अबाधित राहिला पाहिजे, अशी भूमिका काँग्रेस पक्षाची पूर्वीपासून राहिलेली आहे; परंतु या भूमिकेला छेद देत देशातील एससी, एसटी, ओबीसी या संवर्गात येणाऱ्या जाती-जमातींना आरक्षणापासून वंचित ठेवण्याची भूमिका केंद्र शासनाने घेतली आहे. 

अनेक मान्यवरांचा सहभाग 
या सर्व बाबींच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत यांच्यासह काँग्रेसचे महानगराध्यक्ष आमदार अमर राजूरकर, जिल्हाध्यक्ष गोविंद शिंदे नागेलीकर, आमदार रावसाहेब अंतापूरकर, माजी आमदार हणमंत पाटील बेटमोगरेकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर दीक्षा धबाले, सभापती अमितसिंह तेहरा, सभापती संजय बेळगे, सुशीला बेटमोगरेकर, महिला काँग्रेस अध्यक्षा कविता कळसकर, अनुजा तेहरा, माजी महापौर अब्दुल सत्तार, माजी जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, माजी उपमहापौर आनंद चव्हाण, शमीम अब्दुल्ला, किशोर भवरे, माजी सभापती मसूद खान, आनंदा गुंडले, सोनाजीराव सरोदे, पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या कवाडे गटाचे बापूराव गजभारे, आदी उपस्थित होते. आंदोलनादरम्यान प्रमुख पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली. त्यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना सादर करण्यात आले.


कॉँग्रेसचा विरोध राहणार
कॉँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेडला कॉँग्रेसच्या वतीने भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले आहे. भाजपच्या आरक्षण संदर्भातील धोरणांना कॉँग्रेसचा कायम विरोध राहणार असून त्यासाठी राज्यभरात सर्व ठिकाणी आंदोलन करण्यात आले आहे. 
- अमर राजूरकर, आमदार तथा महानगराध्यक्ष, कॉँग्रेस, नांदेड.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT