file photo 
मराठवाडा

नांदेडात प्रेमी युगलांना मारहाण करून लुटले

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : हडको येथे आपल्या एका मैत्रीणीसोबत शहरातून जाणाऱ्या प्रेमी युगलांना रस्त्यात अडवून तलवारीने व दगडाने मारून जखमी केले. यानंतर अनोळखी दोघांनी ४० हजाराची प्रत्येकी सहा ग्राम वजनाची सोन्याची पोत व अंगठी जबरीने चोरुन नेली. ही घटना हस्सापूर ते मामा चौक दरम्यान शनिवारी (ता. एक) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. 

हडको एन. डी. ३१ मध्ये राहणारा विनोद कल्याणकर होळकर (वय ३१) हा नांदेडहून शनिवारी (ता. एक) रात्री नऊच्या सुमारास आपल्या दुचाकीवर मैत्रीणीसोबत निघाला. तो हस्सापूर ते मामा चौक रस्त्याने जात असताना पुलाजवळ एका दुचाकीवर थांबलेल्या दोन युवकांनी त्याला अडविले. तलवारीने त्याला मारून जखमी केले. यानंतर त्याच्या मैत्रीणीलाही मारहाण केली. एवढेच नाही तर तिच्या गळ्यातील ४० हजार रुपये किंमतीची सहा ग्राम वजनाची सोन्याची पोत जबरीने तोडून घेतली. तसेच हातातील सहा ग्राम वजनाची सोन्याची अंगठीही काढून घेतली.

ठार मारण्याची धमकी

तसेच पोलिसात तक्रार दिली तर ठार मारण्याची धमकी दिली. जखमी अवस्थेत विनोद होळकर हे नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात गेले. पोलिसांनी त्याला विशष्णुपूरी येथील शासकिय रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर रविवारी (ता. दोन) रात्री त्याच्या फिर्यादीवरुन अनोळखी दोन चोरट्याविरुद्ध जबरी चोरी व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र सांगळे करीत आहेत. 

जालना येथील घटना ताजी 

अख्या महाराष्ट्रात प्रेमी युगलाना बेदम मारहाण करून त्याचे चित्रीकरणाची जालना येथील घटना ताजी असतांनाच अशाच प्रकारची घटना नांदेड शहरात घडली. नांदेडच्या घटनेने पुन्हा जालन्याची घटना ताजी झाली. मात्र नांदेडच्या घटनेत अरोपी हे अनोळखी असून रात्री साडेनऊच्या सुमारास रस्ता अडवून प्रेमी युगलांना मारहाण केली. एवढेच नाही तर चोरट्यांनी मित्राला तलवारीने जबर मारहाण केली. यात तो जखमी झाला. तर त्याच्या मैत्रीणीच्या गळ्यातील सोन्याची पोत व हातातील अंगठी असा ४० हजाराचा ऐवज जबरीने चोरुन नेला. अशाप्रकारच्या वाढत्या घटनामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT