घरफोडी sakal
मराठवाडा

Nanded News : जिल्ह्यात घरफोडी करणारा आरोपी मुद्देमालासह ताब्यात

श्रीकृष्ण कोकाटे यांनी सर्व पोलिस ठाण्यांना दिलेल्या आहेत. रविवारी घरफोडीतील आरोपी हा बिलोली टोल नाक्याजवळ येणार असल्याची गोपनीय माहिती

सकाळ वृत्तसेवा

नांदेड - शहर व जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या आरोपीला सहा लाख ७८ हजार रुपयांच्या मुद्देमालासह रविवारी (ता.१०) स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. सदर आरोपीने चार गुन्हे केल्याचे कबुल केले आहे.

शहर व जिल्ह्यातील घरफोडी करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सर्व पोलिस ठाण्यांना दिलेल्या आहेत. रविवारी घरफोडीतील आरोपी हा बिलोली टोल नाक्याजवळ येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकाऱ्यांना मिळाली.

त्यानुसार सापळा लावून अमरिश उर्फ आमऱ्या दुर्जा काळे (वय ४५, रा. जेऊर, ता. अक्कलकोट, ह.मु. दगडपुर, ता.बिलोली) याला ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली. त्याने पोलिस ठाणे नांदेड ग्रामीण, उस्माननगर, मुखेड आणि नायगाव ठाण्यांतर्गत गुन्हे केल्याची कबुली दिली.

सदर आरोपीकडून घरफोडीतील चोरी केलेले सहा लाख ७८ हजार रुपये किंमतीचे ११३ ग्राम दागिने जप्त केले आहेत. सदर आरोपी हा सोलापूर जिल्ह्यातील खून व दरोड्याच्या गुन्ह्यातून फरार होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या

मार्गदर्शनाखाली रवी वाहुळे, पांडुरंग माने, सचिन सोनवणे या अधिकाऱ्यांसह गुंडेराव करले, संजीव जिंकलवाड, देवा चव्हाण, बालाजी यादरगीरवाड, ज्वालासिंग बावरी, रणधीर राजबन्सी, गजानन बयनवाड, शंकर केंद्रे, घुगे, मुंढे, बिचकेवार व ठाकूर यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT