bike
bike 
मराठवाडा

सैराट, फटाका बुलेटवर नांदेड पोलिसांची कारवाई

प्रल्हाद कांबळे

नांदेड : शहरात आपल्या ताब्यातील फटाका बुलेट वेडीवाकडी व भरधाव वेगात चालविण्याचा नवा फंडा बुलेटस्वारांनी अंगिकारला. मात्र अशा बुलेटवर कारवाई करून दंडात्मक वेळप्रसंगी फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सुचना पोलिस अधिक्षकांनी दिल्याने वाहतुक शाखा हा आदेश तंतोतंत पाळत आहे. सोमवारी (ता. 19) रात्री आठ ते दहाच्या सुमारास वीस बुलेट पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्यात काही पोलिस कर्मचाऱ्यांच्याही असल्याचे सांगण्यात आले. 

नांदेड शहरात मुख्यत: खाजगी शिकवणी वर्ग चालतात त्या रस्त्यावर, भाग्यनगर, आनंदनगर, श्रीनगर, वजिराबाद या भागात रोडरोमीयो आपल्या ताब्यातील दुचाकी मग ती बुलेट अशी अवजड दुचाकी असली तरीही ते वाऱ्याच्या वेगात, समोरील वाहनांना कट मारत वेडीवाकडी चालवून दुसऱ्यांच्या व स्वत:च्या जिवितास धोका होईल अशी चालवित आहेत. अशा वाहनांवर सतत पोलिस निराक्षक चंद्रशेखर कदम व त्यांचे इतर सहकारी दंडात्मक कारवाई करून विद्यार्थी असेल तर त्याला समज देऊन सोडून देतात. परंतु या फायदा अन्य फटाका बुलेट चालक घेत आहेत.

बऱ्याचअंशी दुचाकी चालक वाहतुक शाखेच्या पोलिसांशी हुज्जत घालतात. अशा वाहनधारकांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक संजय जाधव आणि अतिरिक्त पोलिस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी दिल्यानंतर वाहतुक शाखा सक्रीय झाली आहे. सोमवारी रात्री या शाखेच्या वतीने आॅलआऊट आपरेशन राबवुन वीस बुटेल ताब्यात घेतल्या आहेत. सर्व बुलेटवर कारवाई करून त्यांची कागदपत्रे प्रादेशीक परिवहन विभागाकडे पाठविण्यात येणार आहेत. या बुलेटस्वारांचा वाहन परवाना रद्द करावे अशी शिफारस केली जाणार आहे. शहरातील वाहतुक व्यवस्था नीट चालावी व नांदेडकरांना त्रास होणार नाही अशा पध्दतीने आपली वाहने चालवावेत असे आवाहनही कदम यांनी केले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT