sitafal.
sitafal. 
मराठवाडा

नांदेडात सिताफळांची अवक वाढली

नवनाथ येवले

नांदेड : आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऐन थंडीच्या दिवसात येणारी सीताफळे बाजारात दाखल झाली आहेत. दमदार पावसामुळे यंदा सीताफळाच्या झाडांना चांगलाच बहर आला आहे. नांदेडच्या बाजारात चांगल्या प्रतीच्या सीताफळास ३०० ते ३५० रूपये डझनप्रमाणे भाव मिळत आहे. सर्वचस्तरातील लोकांमध्ये आवडीच्या असलेला या रानमेव्याची आवक बोचऱ्या थंडीत वाढत आहे.


जिल्ह्यातील कंधार-लोहा तालुक्यातील डोंगराळ, माळरानावर सीताफळाची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. परिसरातील शेतकरी, शेतमजुर दरवर्षी विक्रीसाठी बाजारात सीताफळे आणतात. त्यातून अनेकांना चांगले उत्पन्न मिळते. लोहा- कंधार तालुक्यात सीताफळाचे आवर्जुन उत्पन्न घेणारे शेतकरी कमीच आहे. परंतु, तालुक्यातील डोंगराळ भागात सीताफळाची अगणित झाडे आहेत.

मागील तीन वर्षाच्या दुष्काळामुळे झाडांच्या संख्येत घट झाली आहे. परंतु, यंदा जूनच्या सुरवातीपासूनच चांगल्या पर्जन्यमानामुळे डोंगरातील सीताफळांची झाडेही मोहरली आहेत.  उपयुक्त हवामानामुळे यंदा डोगरातील झाडांना मोठ्या प्रमाणात फळे लगडली आहेत.
शेतजमिनीमध्ये उत्पादित केलेल्या सीताफळापेक्षा माळरानावर नैसर्गिकरीत्या लगडलेल्या सीताफळांची गोडीच न्यारी आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ डोंगरातील सीताफळांची चव चाखण्यासाठी आतुर असतात. मेंढपाळ, पशुपालक दोन महिने ताजी सीताफळे खाण्याचा आनंद घेतात. आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सीताफळे परिपक्व होतात.


पिकण्याअगोदर काढलेली फळे साधारण चार दिवसात पिकतात. मशागतीशिवाय फळे हातात येत असल्याने उत्पादकांना आणि मजुरांनाही त्याची किंमत वाटत नाही. महिला, शाळकरी मुले सीताफळे तोडून विक्रीस आणतात. त्यांना यातून २०० ते ३००  रुपये प्रतिदिन रोजगार मिळतो. सिताफळाच्या वाढीपासून ते पिकविण्यापर्यंत कोणत्याही रासायनिक प्रक्रियेचा अवलंब होत नसल्याने सीताफळाची आवर्जून खरेदी होत असते. शिक्षणासाठी अथवा नोकरीसाठी परगावी असलेली मंडळी दिवाळीच्या निमित्ताने घरी परतल्यामुळे घाऊक प्रमाणात सीताफळाची खरेदी करून त्याचा सामूहिक आस्वाद घेत आहेत. त्यामुळे गोडीप्रमाणे  सीताफळांना नांदेडच्या बाजारात चांगला भाव मिळत आहे.
-----
आरोग्यासाठी रूग्णांची पसंती

आक्टोबर- नोव्हेंबर महिण्यातील बोचऱ्या थंडीत उपचारार्थ दाखल होणाऱ्या रूग्णांच्या आरोग्यासाठी लाभदायक सिताफळांना अधिक पसंती दिली जात असून डॉक्टरलेन भागात विक्रीसाठी आलेल्या सिताफळांच्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडत आहे.

कच्च्या सिताफळांना मागणी

कच्चा सिताफळांना परिपक्वतेस किमान दोन दिवासाच्या कालावधीमुळे कच्या सिताफळांनाही खवय्यांकडून पसंती मिळत आहे. दरम्यान कच्चा सिताफळांची कॅरेट, डालीवर विक्री होत असून चारशे ते पाचशे रुपयांपर्यंत कॅरेटला भाव मिळत आहे. 



 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Nashik Police: पोलीस महासंचालकांनी घेतला सुरक्षा यंत्रणेचा आढावा! लोकसभा निवडणुक, पंतप्रधान सभेच्या पार्श्वभूमीवर सूचना

Yerwada Jail News : येरवडा कारागृहात कैद्यांकडून हवालदाराला बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT