Nangartas Mahadev Temple Sakal
मराठवाडा

Nangartas Mahadev Temple : निसर्गाच्या सान्निध्यातील नांगरतासचे शिवालय

निसर्गाच्या सान्निध्यातील डोंगरदऱ्यांमध्ये वसलेले नांगरतास येथील शिवालयात श्रावण महिन्यात भाविकांची दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी जमते.

कृष्णा भावसार

मंठा - निसर्गाच्या सान्निध्यातील डोंगरदऱ्यांमध्ये वसलेले नांगरतास येथील शिवालयात श्रावण महिन्यात भाविकांची दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी जमते. यंदाही येथे श्रावण सोमवारनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत.

नांगरतास येथे खोल दरीत महादेवाचे पुरातन हेमाडपंती मंदिर आहे. तीन बाजूने उंच डोंगर आहे. मंदिराच्या बाजूने झुळझुळ वाहणारा ओढा आहे. तसेच डोंगरावर विविध प्रकारची झाडी असून दिवसभर पक्षाचा किलबिलाट राहतो. अशा या निसर्गरम्य ठिकाणी अनेक भाविक भंडाऱ्याचे आयोजन करतात.

अनेक जण सहकुटुंब देवदर्शनाबरोबरच वनभोजनाचा आनंद घेतात. जिल्ह्यातील अनेक शाळा रविवारी मुद्दाम नांगरतास येथे सहली नेतात. या निसर्गरम्य वातावरणात विद्यार्थ्यांना डोंगरावर चढणे, ओढ्यातून झुळझुळ वाहणाऱ्या पाण्यात खेळणे, छोटा धबधबा दाखविणे, विविध पक्ष्यांची, वृक्षाची माहिती शिक्षक विद्यार्थ्यांना सांगतात.

नांगरतास या निसर्ग रम्य व धार्मिकस्थळी दरवर्षी श्रावण महिन्यात व पर्यटकांची मोठी गर्दी असते. यावर्षी तालुक्यात अत्यल्प पाऊस पडल्याने आतापर्यंत तालुक्यातील नदी, ओढे खळखळून वाहिले नाही. तसेच डोंगर माथ्यावरील हिरव्या गवताची वाढ देखील झाली नाही. तरीही नांगरतास येथे देवदर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांची गर्दी होत आहे.

चाळीस-पंचेचाळीस वर्षांपूर्वी श्री रामगुरू महाराजांनी पुरातन महादेव मंदिराची दुरुस्ती व मंदिरासमोर लोकसहभागातून सभामंडपाचे काम केले. मंदिर परिसर विकसित केला. या ठिकाणी रामगिरी महाराज व सेवाधारी महाराज यांचे समाधी मंदिर आहे. भागवत गिरी महाराज व बालक गिरी महाराज परिसराची देखभाल करतात.

विविध शिवालयांमध्ये कार्यक्रम

श्रावण महिन्यात तालुक्यातील नीळकंठेश्वर, केदार वाकडी, हेलस तसेच नांगरतास, शंभू महादेव या धार्मिक व निसर्गरम्य स्थळी भाविक व पर्यटकांची मोठी गर्दी असते. या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमही होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pharmacy College Ban: राज्यात नवीन फार्मसी महाविद्यालयांना बंदी! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; कारण काय?

IPL 2026: श्रेयस अय्यरची स्पेशल सेंच्युरी! धोनी, रोहित, विराटच्या पंक्तीत मिळवलंय स्थान

'मी अनिल कपूरसारख्या माणसासोबत कधीच लग्न करणार नाही' असं का म्हणाली होती माधूरी?

विवाहित सतीश राजवाडेंसोबत जोडलं गेलेलं मुक्ता बर्वेचं नाव; पत्नीने दिलेली अशी प्रतिक्रिया, म्हणाली, 'मी स्वतः त्याला...'

Nursing Day Celebration: समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा

SCROLL FOR NEXT