Dhananjay Munde 
मराठवाडा

बहिणबाई, राष्ट्रवादीचा समारोप चिक्की खाण्याइतका सोपा नाही : मुंडे

लक्ष्मण वाकडे

परळी : या मैदानावर पहिली सभा झाली तेव्हा दिवंगत अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते आणि आता शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही परिवर्तन यात्रेची सांगता सभा होत आहे हा योगायोग आहे. माझ्या बहिणबाई म्हणाल्या, राष्ट्रवादीचा समारोप करू, राष्ट्रवादी काँग्रेस संपवने चिक्की खाण्याइतके सोपे नाही. लोकसभा निवडणुकीत, विधानसभा निवडणुकीत समोरासमोर या बघू कोण संपतंय असे आव्हानही विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिले. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेचा समारोप आणि महाआघाडीची दुसरी संयुक्त सभा शनिवारी (ता. २३) येथे झाली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह नेत्यांची उपस्थिती होती. 

धनंजय मुंडे म्हणाले, स्वतःला दिवंगत गोपीनाथराव मुंडेंचे राजकीय वारस सांगतात. मात्र, त्यांच्या सरकार घोषणा केलेले ऊसतोड कामगार महामंडळच रद्द केले. हा दिवंगत मुंडेंचा अपमान आहे. 

मुख्यमंत्री भुजबळांना जामिनावर सुटलेले आहेत असे म्हणतात. मात्र, तुम्ही मुख्यमंत्री असाल तरी आमच्या वाटेला जाऊ नका. जशाला तसं उत्तर द्यायची धमक आमच्यात आहे. अमित शाह तडीपार आहे, तुम्ही कोणावर आरोप करता ? आधी १६ मंत्र्यांच्या जे भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढले आहे त्याची चौकशी करा असे आव्हानही त्यांनी दिले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live : मुंबई इंडियन्सने १४ वर्षांचा 'शाप' संपवला! IPL मधील सर्वात मोठा विजय मिळवला; रोहित, रिकल्टनची मॅच विनिंग खेळी

कोल्हापूरची अमृता पुजारी महिला महाराष्ट्र केसरी; वेदिकाला अस्मान दाखवत जिंकली चांदीची गदा अन् कार

अपहरणकर्त्यांचा कॉल ‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात, ५० लाख द्या, पोलिसांत गेल्यास मुलाला ठार मारु’; सोलापूर पोलिसांच्या ‘एलसीबी’ची १४ तासांची मेहनत अन्‌...

MI vs KKR Live: रोहित शर्माची IPL इतिहासातील वेगवान फिफ्टी! ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, 'फॅब फोअर'च्या पंक्तित बसला

Land Survey: भूमापन प्रक्रिया होणार वेगवान! फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय; जमीन मोजणीसाठी नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT