file photo 
मराठवाडा

शेतीसाठी लोअर दुधनातुन पाणी सोडण्याची आवश्यकता

अनिल जोशी

परभणी : सद्यस्थितीला परिसरात गहु व ज्वारी पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. यापूर्वी दोन पाणी पाळ्या झाल्या असून तिसरी पाणी पाळी होणार आहे. परंतु उशिरा पेरलेल्या पिकाना अजून ही पाण्याची आवश्यकता असल्याने लोअर दुधनातून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत.

शेतकऱ्यांनी कापूस उपटून त्यामध्ये ज्वारी व गव्हाचे पीक घेतले आहे. अनेक शेतकऱ्यांनी ज्वारी व गहू व गव्हाची उशिरा पेरणी केल्याने मे महिन्यापर्यंत पाणी देण्याची आवश्यकता आहे. अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमूग पीक घेतल्यामुळे पाणी सोडण्याची पाणी सोडण्याची मागणी झरी परिसरातून होत आहे. एक तर कपाशीचे पीक गेले. परंतु त्यामध्ये दुसरे पीक म्हणून शेतकऱ्यांनी ज्वारी व गव्हाला प्राधान्य दिले. एप्रिल आणि मे महिन्यात विहिरींना व बोरला पाणी कमी होत असल्यामुळे हे पीकही जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने सदरील बाबीचा विचार करून  एप्रिल व मे महिन्यात दोन पाणी पाळ्या सोडाव्यात अशी मागणी परिसरातून होत आहे. तातडीने परिसरातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पाण्याची पाळी सोडावी अन्यथा आंदोलन करण्यात येई असा इशारा भाजप तालुकाध्यक्ष संदीप जाधव यांनी  दिला आहे.

मी कपाशीचे पीक उपटून त्यामध्ये गव्हाचे पीक घेतले आहे. गव्हाला पाच पाण्याची आवश्यकता असते. लोअर दुधनाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडावे.

- अनिल वटारे, शेतकरी

सद्यस्थितीला आम्ही जनावरांच्या चाऱ्यासाठी गजरा व निवड याची लागवड केली आहे मे महिन्यात विहिरींचे पाणी कमी होते माझ्याकडे नऊ ते दहा जनावरे आहेत त्यांना हिरवा चारा याचीही सोय होईल दुभती जनावरे असल्यामुळे पाणी सोडण्याची जेणेकरून हिरवा चारा जनावरांना मिळेल

- सुरेश जगाडे, शेतकरी

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी खुशखबर! मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकलच्या आणखी १० फेऱ्या, १२ डब्यांच्या लोकलचे १५ डब्यांत रूपांतर

FDA Crime : पुणे शहरातील प्रसिद्ध गोल्‍डन बेकरीसह दहा बेकरी, रेस्टॉरंटचे परवाने निलंबित; अस्वच्छतेप्रकरणी एफडीएची कारवाई

Garfield Sobers: क्रिकेटच्या इतिहासातील महान ऑलराउंडर काळाच्या पडद्याआड! गॅरी सोबर्स यांचं निधन; क्रीडाजगत शोकसागरात

Pune News : जप्त गुळाचे करायचे काय? गूळ उत्पादकांचा सवाल, जवळपास ४०० गुऱ्हाळांवर परिणाम

Amritsar Express: अमृतसर एक्स्प्रेसच्या डब्याखाली सापडला मानवी पाय; सीएसएमटी रेल्वे यार्डमधील घटना, रेल्वे पोलिसांना वेगळाच संशय

SCROLL FOR NEXT