मराठवाडा

राजकीय दुष्काळ हटविण्याची गरज - उद्धव ठाकरे

सकाळवृत्तसेवा

बीड - एक दुष्काळ मी हटवतो, दुसरा राजकीय दुष्काळ तुम्ही हटवा, असे आवाहन करत दुष्काळ गंभीर असला तरी शिवसेना शेतकऱ्यांसोबत खंबीर आहे, असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिले. बुधवारी (ता. ९) ते बीड आणि जालना जिल्ह्याच्या दुष्काळ दौऱ्यावर होते.  

बीडमध्ये ठाकरे यांच्या हस्ते दुष्काळग्रस्त पशुपालक शेतकऱ्यांना पशुखाद्य वाटप आणि पाण्यासाठी टाक्‍यांचे वाटप करण्यात आले. यानंतर झालेल्या सभेत त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर जोरदार टीकास्त्र सोडले.

मी ‘जन की बात’ करतो
ठाकरे म्हणाले, बीडमध्ये केंद्रीय पथक आल्यानंतर दिलासा मिळण्याऐवजी उलट रेशनमध्ये कपात झाली. राममंदिराच्या मुद्यावरूनही त्यांनी सरकारला धारेवर धरले. निर्णय न्यायालय देणार असेल तर मग तुम्ही जाहीरनाम्यात राममंदिराचे वचन का दिलेत, असा सवाल त्यांनी केला. पीकविमा योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत मी ‘मन की बात’ नाही, ‘जन की बात’ करतो, खरे बोलून एकही मत मिळाले नाही तरी चालेल; पण खोटे बोलून मिळालेली मते नकोत, असे शिवसेनाप्रमुखांनी सांगितले होते, असे ठाकरे म्हणाले. या वेळी पर्यावरणमंत्री रामदास कदम, खासदार चंद्रकांत खैरे, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह अनेक नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

‘युती गेली खड्ड्यात’
युतीबाबत बोलताना ठाकरे म्हणाले, युतीची चर्चा गेली खड्ड्यात, आधी शेतकऱ्यांचे काय करता ते बोला. सरकारी यंत्रणेच्या सुस्त पडलेल्या अजगराला ढोसण्यासाठी मी फिरतोय. कोरडी भाषणे आणि घोषणांनी हंडे भरत नाहीत, आपला कोण आणि ‘थापाड्या’ कोण, हे जनतेने ओळखावे.

‘राफेल’पेक्षाही विमा गैरव्यवहार मोठा 
जालना - विमा कंपन्या शेतकऱ्यांकडून विम्यापोटी रक्कम भरून घेतात; मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना तुटपुंजी रक्‍कम दिली जाते. सरकारने पीक कर्जमाफी योजना जाहीर केली. मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही, ‘राफेल’पेक्षा विमा कंपन्यांचा गैरव्यवहार अधिक मोठा असल्याचा आरोप ठाकरे यांनी जालन्यात केला. जालन्यातील शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. ‘रडतात साले,’ असा शेतकऱ्यांचा उल्लेख करणाऱ्यांना आता शेतकरी रडवतील, असा टोलाही त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे नाव न घेता लगावला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: निवडणूक प्रचारादरम्यान हेलिकॉप्टरमध्ये चढत असताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जखमी

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT