आमदार राणाजगजितसिंह पाटील  
मराठवाडा

कौडगाव औद्योगिक वसाहतीत सोलर-थर्मल ऊर्जा प्रकल्प उभारावा

राजेंद्रकुमार जाधव

उस्मानाबाद : तालुक्यातील कौडगाव येथील औद्योगिक क्षेत्रामध्ये २५० मेगावॉटचा हायब्रीड सोलर-थर्मल ऊर्जा प्रकल्प उभारावा, अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

यासंदर्भात आमदार पाटील यांनी ऊर्जामंत्री राऊत यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे, की कमी दरडोई उत्पन्न असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात रोजगारनिर्मिती वाढविण्याच्या अनुषंगाने कौडगाव येथील औद्योगिक क्षेत्रात ‘महाजनको’च्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या ५० मेगावॉट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाजवळ उपलब्ध जमिनीवर २५० मेगावॉटचा हायब्रीड सोलर-थर्मल ऊर्जा प्रकल्प प्रस्तावित करण्यासाठी पुढाकार घेऊन संबंधितांना निर्देश द्यावेत.

उस्मानाबाद जिल्ह्याचा मानव निर्देशांक कमी असून, निती आयोगाने निवडलेल्या देशातील ११५ आकांक्षित जिल्ह्यामध्ये उस्मानाबादचा समावेश आहे. जिल्ह्यात एकही मोठा उद्योग नाही. जिल्ह्याचे अर्थकारण केवळ शेतीवर अवलंबून आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अनेक तरुण आपल्या गावी परत आले आहेत. अशा परिस्थितीत येथे रोजगारनिर्मिती वाढविण्यासाठी सोलर पॅनेल उत्पादन, टेक्स्टाईल पार्क, उपकरण निर्मिती आणि अन्य उत्पादन उद्योग आणणे गरजेचे आहे. 

जिल्ह्यात वर्षातील अंदाजे ३०० दिवस स्वच्छ सूर्यप्रकाश उपलब्ध असल्यामुळे मोठ्या प्रमाणात सौरऊर्जेवर आधारित वीजनिर्मिती प्रकल्प उभारणे शक्य आहे. कौडगाव येथील औद्योगिक क्षेत्रात दीड हजार एकर जमिनीचे संपादन पूर्ण झाले असून, यातील जवळपास ११८ हेक्टरवर ‘महाजनको’च्या माध्यमातून ५० मेगावॉट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे. उजनी जलाशयातून उस्मानाबाद शहराला पाणीपुरवठा करीत असलेल्या योजनेतून या एमआयडीसी क्षेत्राला एक एमएलडी पाणी देण्याबाबतचा करार करण्यात आलेला आहे. उच्चदाबाची वीजवाहिनी व रिलायन्स गॅस लाइन याच क्षेत्रातून पुढे जाते.

राज्यात महानिर्मिती आणि एनटीपीसीच्या संयुक्त प्रयत्नांतून दोन हजार ५०० मेगावॉटचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी महानिर्मितीने जागेचा शोध घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश आपण दिल्याचे समजते. जिल्ह्यातील स्वच्छ सूर्यप्रकाश व रिलायन्स गॅस लाइनच्या उपलब्धतेमुळे येथे हायब्रीड सोलर-थर्मल ऊर्जा प्रकल्प उभारणे उचित राहील. सूर्यप्रकाश नसेल त्यावेळी गॅसच्या माध्यमातून ऊर्जानिर्मिती करणे शक्य होईल.

विजेच्या सर्वोच्च मागणीच्या काळात गॅसच्या उपलब्धतेमुळे अधिकची वीज उत्पादित करून ग्राहकांना देता येऊ शकते. यामुळे २४ तास हा प्रकल्प कार्यान्वित राहून मोठ्या प्रमाणात ऊर्जानिर्मिती करता येऊ शकेल. कौडगावच्या औद्योगिक क्षेत्रात जिल्ह्यातील युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून उत्पादन उद्योगासाठी अंदाजे एक हजार एकर व काही क्षेत्र प्रकल्पग्रस्त भूधारकांसाठी राखीव ठेवण्यात यावे व शिल्लक जागा सौरऊर्जा प्रकल्पासाठी औद्योगिक क्षेत्राकडून महानिर्मितीने मागणी करावी.

राज्यातील अडीच हजार मेगावॉट सौरऊर्जा प्रकल्प उभारणीच्या योजनेमध्ये कौडगाव येथे २५० मेगावॉटचा हायब्रीड सोलर-थर्मल ऊर्जा प्रकल्प प्रस्तावित करणे उचित राहील. त्यामुळे जिल्ह्यात रोजगारनिर्मिती वाढविण्याच्या अनुषंगाने कौडगावच्या औद्योगिक क्षेत्रात ‘महाजनको’च्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या ५० मेगावॉट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाजवळील उपलब्ध जमिनीवर २५० मेगावॉटचा हायब्रीड सोलर-थर्मल ऊर्जा प्रकल्प प्रस्तावित करण्यासाठी पुढाकार घेऊन संबंधितांना निर्देश द्यावेत, अशी मागणी आमदार पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: भारताच्या 'या' दोन खेळाडूंमुळे India vs Pakistan सामन्याची तिकीटं विकली जात नाहीत; एमिरेट्स क्रिकेट बोर्डाचा मोठा दावा

Vasantha Ramaswamy : माजी शास्त्रज्ञ डॉ. वसंथा रामास्वामी यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

Latest Marathi News Updates Live : नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी सशस्त्र सीमा दलाने (SSB) एक विशेष 24x7 हेल्पलाइन सुरू केली

Navratri 2025: आपण नवरात्र का साजरी करतो? हे आहे आध्यात्मिक महत्त्व आणि कारण

Mumbai Crime: आईचं मुलीच्या प्रियकरावर प्रेम जडले, एकत्र राहण्यासाठी मास्टरप्लॅन आखला, पण नंतर जे घडले त्याने सगळेच हादरले

SCROLL FOR NEXT