file photo
file photo 
मराठवाडा

रागाच्या भरात विद्यार्थिनीची आत्महत्या 

मनोज साखरे

औरंगाबाद : अभ्यास करीत नसल्याने मोठी बहीण रागावल्यावरुन आठवीतील विद्यार्थिनीने घरालगतच्या उद्यानातील विहीरीत उडी घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (ता. 20) सकाळी हडको एन-11 भागात उघडकीस आली. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, शिल्पा रामकुमार धनगावकर (वय 14, रा. सुदर्शननगर, एन-11 हडको) असे विद्यार्थिनीचे नाव आहे. अभ्यास करीत नसल्याने शिल्पाला तिची थोरली बहिण रागावली होती. त्यामुळे बुधवारी (ता. 18) रात्री ती रागाच्या भरात घरातून निघून गेली. त्यानंतर उशिरापर्यंत ती घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबियांनी रात्रभर शोधाशोध केली. परंतु ती सापडत नसल्याने रात्री अकरानंतर तिचा भाऊ मोहन याने शिल्पा हरवल्याबाबत सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दिली. शुक्रवारी सकाळी हडको परिसरातील बाळासाहेब ठाकरे उद्यानात फिरण्यासाठी आल्यानंतर विहिरीतील पाण्यावर तिचा मृतदेह तरंगताना नागरिकांना आढळला. त्यानंतर याची माहिती शिल्पाच्या कुटुंबियांना देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तिचा मृतदेह बाहेर काढला. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT