मकरंद पत्की व अशोक जाधव
मकरंद पत्की व अशोक जाधव  
मराठवाडा

गायकीही वाचली अन्‌ गळाही!

मनोज साखरे

औरंगाबाद - थायरॉईड ग्रंथीच्या मोठ्या गाठीने ते त्रस्त होते. ऑपरेशन करावे तर आवाज जाईल, अशी भीती म्हणून सोळा वर्षे आजार अंगावरच काढला; पण दुर्धर आजार होईल, या भीतीने पुन्हा त्यांनी शस्त्रक्रियेसाठी मनाचा निर्णय केला आणि त्यांनाही गायक असलेले डॉक्‍टर भेटले. या डॉक्‍टरांनीही सर्व स्वरयंत्राच्या नसा वाचवून गाठ काढली, किचकट शस्त्रक्रियेमुळे त्यांचा आजार दूर झाला आणि गायकीही वाचली! 

बुलडाणा जिल्ह्यातील अशोक जाधव असे या कलाकाराचे नाव आहे. कलाकार असतानाही ते कामगार म्हणून कंपनीत काम करतात. ते उत्तम कव्वाली गायक आहेत. मुंबईत ऑर्केस्ट्रामध्येही त्यांनी गाणी गायिली; परंतु सोळा ते सतरा वर्षांपासून ते थायरॉईडच्या ग्रंथीच्या मोठ्या गाठीने त्रस्त होते. आजार बळावताना कर्करोग होईल की काय, याचीही त्यांच्या मनी भीती होती. म्हणून ते अनुभवी शल्यचिकित्सकाच्या शोधात होते.

त्यांना डॉ. विवेक चर्जन यांनी थायरॉईड व लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. मकरंद पत्की यांचे नाव सुचविले. ते चोवीस वर्षांपासून सिडको येथे खासगी रुग्णालयात प्रॅक्‍टिस करतात. तेही गायक असल्याने त्यांना गायकी, संगीताबाबतची समज होतीच. त्यांनी गायकीचे चार वर्षे धडेही घेतले, श्रेया घोषाल यांच्या संगीत समारंभातही गाणे गायिले आहे. त्यामुळे त्यांनी रुग्णाच्याही गायकीचे भान जपत अशोक जाधव यांची शस्त्रक्रिया केली. 

सहा तास चालली शस्त्रक्रिया 
अशोक जाधव यांची थायरॉईडची गाठ मानच नव्हे, तर छातीपर्यंत पसरली होती. त्यांची शस्त्रक्रिया शहरातील खासगी रुग्णालयात 26 जून 2019 ला पार पडली. डॉ. पत्की यांनी सहा तास शस्त्रक्रिया केली. यात दोन तास थायरॉईडची गाठ काढण्यासाठी लागले. त्यांना डॉ. भास्कर मुसांडे, डॉ. माणिक देशपांडे, डॉ. प्रमोद अपसिंगेकर, डॉ. मनोहर काळबांडे व डॉ.अन्नछत्रे यांनी मदत केली. या शस्त्रक्रियेनंतर अशोक जाधव गाऊ शकणार आहेत. डॉक्‍टरांच्या चमूचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT