File photo
File photo 
मराठवाडा

साडेदहा लाख भाविकांनी घेतले तुळजाभवानीचे दर्शन

सकाळ वृत्तसेवा

तुळजापूर (जि. उस्मानाबाद) ः तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवात सुमारे दहा लाख 58 हजार भाविकांनी दर्शन घेतले, अशी माहिती मंदिर समितीच्या सूत्रांकडून देण्यात आली. 


तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवास 29 सप्टेंबरपासून सुरवात झाली होती. कोजागरी पौर्णिमेपर्यंत चाललेल्या नवरात्रोत्सवात विविध कार्यक्रम घेण्यात आले. घटस्थापनेपूर्वी नवरात्र ज्योत घेण्यासाठी येणारे भाविक कळसाचे दर्शन घेऊन परत जातात; तसेच अश्विनी पौर्णिमेस आलेले लाखो भाविक कळस दर्शन घेऊन परत जातात. तुळजाभवानी मातेच्या नवरात्रात दरवर्षीच्या तुलनेत यंदा पश्‍चिम महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी; तसेच मराठवाड्यातील दुष्काळ आणि विधानसभा निवडणुकीत सरकारी कर्मचारी गुंतल्यामुळे बहुतांश कर्मचारीवर्ग नवरात्रात येऊ शकला नाही. राज्यात विधानसभा निवडणुका असल्याने नवरात्र ज्योतीसाठी युवकवर्गाचा मोठा सहभाग घटस्थापनेपूर्वी दिसून आला. मात्र, नवरात्रात पावसामुळे भाविकांची संख्या रोडावली होती.


तुळजाभवानी मातेच्या नवरात्राच्या निमित्ताने घाटशीळ वाहनतळाजवळ मंदिर समितीने केलेल्या प्रवेश पासच्या ठिकाणी अभिषेक पास, तसेच धर्मदर्शन व मुखदर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत. ही आकडेवारी मंदिर प्रशासनाकडे आलेली आहे. प्रशासनाने यात्रा नियोजन करताना जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी मंदिर समितीच्या अध्यक्षा दीपा मुधोळ-मुंडे व जिल्हा पोलिस अधीक्षक राजतिलक रोशन यांनी भाविक, पुजाऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, याची काळजी प्रशासनाने घेतली. 


तुळजाभवानी मातेच्या नवरात्रात 10 लाख 58 हजार भाविकांनी दर्शन घेतले. तसेच कळस दर्शन घेणाऱ्यांची संख्याही खूप मोठी आहे. 
- योगिता कोल्हे, मंदिर समितीच्या सरव्यवस्थापिका तथा तहसीलदार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT