marathi
marathi 
मराठवाडा

आगामी साहित्य संमेलन मराठवाड्यात

सुशांत सांगवे

लातूर : गेल्या 14 वर्षांत मराठवाड्यात एकही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होऊ शकले नाही. त्यामुळे आगामी साहित्य संमेलन मराठवाड्यात घेण्याच्या हालचाली साहित्य महामंडळात सुरु झाल्या आहेत. त्यातच लातूरमधील एका ग्रंथालयाने महामंडळाकडे निमंत्रण पाठवले आहे. तर उस्मानाबादमधूनही काही संस्थांनी निमंत्रण पाठविण्याची तयारी सुरु केली आहे. यापैकी एका ठिकाणी आगामी साहित्य संमेलन होणार आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, डॉ. वि. भि. कोलते संशोधन केंद्र व वाचनालय आणि विदर्भ साहित्य संघ यांच्या वतीने 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळ येथे आयोजित करण्यात आले होते. वक्ते, सूत्रसंचालक यांच्यासाठी तयार करण्यात आलेले दरपत्रक आणि निमंत्रणवापसी या कारणांमुळे हे संमेलन वादाच्या भोवऱ्यात सापडले असले तरी श्रोत्यांच्या अलोट गर्दीमुळे ते यशस्वीही झाले. या संमेलनाचे सूप वाजल्यानंतर आता आगामी साहित्य संमेलनाची चर्चा साहित्य वर्तुळात सुरु झाली आहे.

लातूरमधील जिल्हा ग्रंथालय आणि मराठवाडा साहित्य परिषदेच्या लातूर शाखेने आगामी संमेलन घेण्याची तयारी दर्शवली आहे. तसे निमंत्रणही त्यांनी महामंडळाला दिले आहे. याबरोबरच बुलढाण्यातील एका ग्रंथालयाने महामंडळाला निमंत्रण दिले आहे, अशी माहिती महामंडळाच्या प्रभारी अध्यक्ष विद्या देवधर यांनी "सकाळ'ला दिली. या दोन निमंत्रणाबरोबरच उस्मानाबादमधूनही साहित्य संमेलनाचे निमंत्रण महामंडळाकडे येणार आहे. यापैकी मराठवाड्यातील एक निमंत्रणावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. याआधी 2004 मध्ये प्रा. रा. ग. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबादमध्ये संमेलन झाले होते. त्यानंतर मराठवाड्यात संमेलन झाले नाही. त्यामुळे आगामी संमेलन मराठवाड्यातच व्हावे, अशी मागणीही रसिकांमधून होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : इचलकरंजीत पवारांना पाहण्यासाठी गर्दी उसळल्याने चेंगराचेंगरी झाली आहे

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: दमदार सुरुवातीनंतर चेन्नई संघ सापडला अडचणीत; दुबेनंतर जडेजाही स्वस्तात बाद

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

SCROLL FOR NEXT