Sambhaji Patil Nilangekar News Nilanga
Sambhaji Patil Nilangekar News Nilanga  
मराठवाडा

शिवसंकल्पाने निलंग्यात निलंगेकर आजोबा नातवाचा राजकीय संगम

राम काळगे

निलंगा (जि.लातूर) : कट्टर राजकीय विरोधक समजले जाणारे निलंगेकर कुटुंबांतील आजोबा माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर  व नातू माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर  शिवजयंतीनिमित्त बुधवारी (ता. १९) येथे एकत्र आले. येथे काही दिवसापूर्वी झालेल्या दर्गा ऊरुसाच्या कार्यक्रमात आजोबांनी नातवासोबतचे नाते जाहिरपणे सांगण्याची सुचना केली आणि बुधवारी थेट नातवासोबत हजेरी लावून सर्वांना धक्का दिला. त्यापुढे जाऊन दोघांनी शिवजयंतीनिमित्त शिवसंकल्पही केला.


यामुळे गेल्या अनेक वर्षापासून निलंगेकरांच्या दोन वाड्यातील राजकारणाचा यानिमित्ताने संगम झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. कॉंग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर आजोबा व भारतीय जनता पार्टीचे युवा नेते संभाजीराव पाटील निलंगेकर या आजोबा- नातू मध्ये राजकीय मतभेद असून एकमेकांच्या विरोधामध्ये विधानसभा निवडणुकीत दोघांनी एकमेकांचा पराभव केला होता. माजी मुख्यमंत्री डॉ. निलंगेकर यांच्या उपस्थितीत गेल्या आठवड्यात येथे दर्गा ऊरूसाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात संयोजकांनी संभाजी पाटील निलंगेकर यांच्या योगदानाची माहिती दिली. त्या वेळी डॉ. निलंगेकर यांनी संभाजी पाटील यांच्यासोबत त्यांचे असलेले नाते सांगण्याचा आग्रह धरला होता. तेव्हापासूनच दोघांच्या नात्यांतील कटुता कमी झाल्याची चर्चा सुरू होती. त्याला बुधवारी अधिकृत दुजोरा मिळाला. शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला दोघांनी पहिल्यांदाच एकत्र हजेरी लावली.  संभाजी पाटील निलंगेकर यांनीही दुष्काळ मुक्तीचा शिवसंकल्प करून उपस्थितांना शपथ दिली.  


डॉ. निलंगेकर यांनीही ही शपथ घेत शिवसंकल्प केला. वृक्षारोपण, सर्वधर्मसमभाव, निर्व्यसनी जीवन, पाणी आडवा पाणी जिरवा करून जलसंवर्धन करणे, स्त्रियांचा सन्मान करण्याबाबत ही शपथ होती. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, माजी आमदार गोविंद केंद्रे, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश आप्पा कराड, अरविंद पाटील निलंगेकर, नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष भारतबाई सोळुंके, पंचायत समितीच्या सभापती राधाताई बिरादार माजी सभापती अजित माने अजित पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल

SCROLL FOR NEXT