nine accused arrested in six murders in Palam parbhani
nine accused arrested in six murders in Palam parbhani 
मराठवाडा

पालममधील सहा गुन्हयाची उकल; 9 आरोपींना अटक

सकाळवृत्तसेवा

परभणी : पालम पोलिस ठाण्यातंर्गत दाखल असलेल्या सहा गुन्ह्याची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. यात सहा मोटार सायकल व इतर साहित्य पोलिसांनी हस्तगत केले असून नऊ आरोपींना अटक करण्यात आले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी शनिवारी (ता. 22) दिली.

पालम शहरासह तालुक्यात वाहने चोरी व इतर चोरीच्या घटना घडल्या होत्या. याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे होता. हे सर्व गुन्हे 2017 व 2018 सालातील होते. मोटार सायकलच्या चोरी प्रकरणात आरोपी विनायक शिवाजी हाके (रा. हाके गल्ली, पालम), बालाजी पांडूरंग सुरनर (रा.नवामोंढा, पालम), सद्दाम शेख बाबु (रा. शिवाजी चौक, लोहा जि. नांदेड), माधव निवृत्ती हत्तीअंबिरे (रा. बौध्दवाडा, पालम) यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून एक स्कुटी, एक डिलक्स मोटार सायकल, एक पल्सर व इतर साहित्य जप्त करण्यात आले.

दुसऱ्या चोरीच्या प्रकरणात पालम शहरातील भांड्याचा नामांकित व्यापारी शेख गौस हा दुकानाच्या आड चोरीची साहित्य विकत घेत असल्याचे तपासात उघड झाले. आरोपी शेख गौस (रा. पालम), सालेमिया मोहम्मद चाऊस (रा. टेक गल्ली, पालम), शाहरुख समिर पठाण (रा. पठाण गल्ली, पालम), रईस पठाण समद पठाण (रा. पालम) व अफरोज पठाण खलंदर पठाण (रा. पालम) यांच्याकडून तांब्याच्या पट्ट्या व रॉड हस्तगत करण्यात आला. या आरोपींकडून 1 लाख 56 हजार 265 रुपयांचा माल हस्तगत केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT