मराठवाडा

पिशोरच्या सरपंचावर अविश्वास ठराव संमत

सकाळ वृत्तसेवा

पिशोर (जि.औरंगाबाद) : कन्नड तालुक्‍यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या पिशोर येथील ग्रामपंचायतीचे सरपंच नारायण काळू मोकासे यांच्यावर सोमवारी (ता. 11) अविश्वास ठराव संमत करण्यात आला. चार वर्षांपूर्वी पिशोर ग्रामपंचायतीच्या सतरा ग्रामपंचायत सदस्य निवडीसाठी तीन पॅनेलमध्ये झालेल्या लढतीत नारायण मोकासे व बाळासाहेब जाधव यांच्या दोन पॅनेलचे सतरापैकी दहा सदस्य निवडून आले.

नारायण मोकासे व बाळासाहेब जाधव यांच्या पॅनेलच्या सदस्यांनी एकत्र येत ग्रामपंचायत ताब्यात घेतली आणि नारायण मोकासे यांच्याकडे सरपंचपद आले होते. विद्यमान सरपंच श्री. मोकासे यांनी चार वर्षे चार महिने ग्रामपंचायतीचा कारभार चालविला. परंतु ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेणे, सदस्यांना न विचारता परस्पर निर्णय घेणे, मनमानी कारभार करणे, पदाचा गैरपवापर करणे, सदस्यांना धमक्‍या देऊन शिवीगाळ करणे आदी आरोप करीत सतरा सदस्यांपैकी बारा सदस्यांनी सरपंच नारायण मोकासे यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव घेऊन सदरील निवेदन तहसीलदार यांना सोपविले.

यावेळी पिशोरचे ग्रामविकास अधिकारी सुधाकर घुले उपस्थित होते. विद्यमान सदस्य बाळासाहेब जाधव, उपसरपंच अरुण सोनवणे, सदस्य उमेश मोकासे, नारायण खडके, किसन मोकासे, एजाज पठाण, शांताबाई दवंगे, अनिता मोकासे, अशोक जाधव, रेणाबाई सुरडकर, सुमनबाई परदेशी, महेमुदाबी शेख यांच्या या अविश्वास ठरावावर सह्या आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT