Udgir Corona Updates, Latur
Udgir Corona Updates, Latur 
मराठवाडा

पाच रुग्णांना रुग्णालयातून मिळाली सुटी, उदगिरात आता बारा पॉझिटिव्ह रुग्ण

युवराज धोतरे

उदगीर (जि.लातूर) : कोरोना रुग्णालयातून मंगळवारी (ता.२६) तीन, तर बुधवारी (ता.२७) दोन अशा पाचजणांना उपचार संपल्याने घरी पाठवण्यात आले. सतरापैकी पाच रुग्णांना सुटी दिल्याने उदगीरमध्ये आता फक्त १२ पॉझिटिव्ह रुग्ण शिल्लक आहेत. शहरात निर्माण झालेली संसर्गाची पार्श्वभूमी संपत येत असतानाच बाहेरून आलेल्या रुग्णांमुळे उदगीरला दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन, नगरपालिका व महसूल प्रशासनावर मोठा ताण निर्माण झाला आहे. सध्या एकूण तेरा रेड झोन तयार झाले असून या परिसरातील नागरिकांची कुटुंबनिहाय तपासणी करण्यात येत आहे.


उदगीरच्या कोरोना रुग्णालयात एकूण १७ रुग्ण उपचार घेत होते. मंगळवारी (ता.२६) रात्री यातील तीन रुग्णांना कोरोनामुक्त झाल्याने व त्यांचावरील उपचार संपल्याने रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. बुधवारी (ता.२७) दोन अशा पाचजणांना कोरोना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आता शहरातील कोरोना रुग्णालयात आठ तर तोंडार पाटी येथील शासकीय वसतिगृहात चार रुग्ण उपचार घेत आहेत. या सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीश हरिदास यांनी सांगितले.

या सहा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना पर्यावरण राज्यमंत्री बनसोडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, पोलिस उपअधीक्षक मधुकर जवळकर, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, पालिकेचे मुख्याधिकारी भारत राठोड, गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. हरिदास, कोरोना रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. शशिकांत देशपांडे, डॉ. दत्ता पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वाती सोनवणे, डॉ. प्रशांत कापसे, डॉ. शशिकांत डांगे, डॉ. मेघश्‍याम कुलकर्णी, डॉ. महेश वाघमारे, डॉ. राणी कदम यांच्या उपस्थितीत फुलांनी स्वागत करून दोन रुग्णांना घरी सोडण्यात आले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chitra Wagh: ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये पॉर्नस्टारचा वापर? चित्रा वाघ यांनी फोटो दाखवत केले गंभीर आरोप

Mahesh Manjrekar : स्वातंत्र्य वीर सावरकर, रणदीपचा हस्तक्षेप आणि मतभेद ; मांजरेकरांनी अखेर सोडलं मौन

Zimbabwe: झिम्बाब्वेने तयार केलं नवं चलन; पण सरकारी खात्यांमध्येच चालेनात नोटा, जनताही नाराज, काय आहे कारण?

T20 World Cup Team India : टी-20 वर्ल्ड कपचे शेर IPL मध्ये ढेर, संघात स्थान मिळताच 'हे' 6 भारतीय खेळाडू ठरलं फ्लॉप

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

SCROLL FOR NEXT