Anjana Pawar sakal
मराठवाडा

Yermala Accident : अज्ञात ट्रकने मागून स्कुटीला धडक दिल्याने नर्सचा जागीच मृत्यू

राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात ट्रकने मागून धडक दिल्याने नर्स अपघातात जागीच ठार.

सकाळ वृत्तसेवा

येरमाळा - येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील नर्स अंजना गोरोबा पवार यांच्या स्कुटीला सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात ट्रकने मागून धडक दिल्याने या अपघातात त्या जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी सहा वाजेच्या सुमारास घडली.

येडशी, ता. धाराशिव येथील रहिवासी येरमाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या चोराखळीच्या उपकेंद्राच्या नर्स अंजना गोरोबा पवार (वय-३२) आज आपल्या ऍक्टिवा स्कुटी क्र. एम.एच.२५ऐ. यु.४२८९ वरुन येडशीकडे जात असताना येरमाळा येथून जवळच असलेल्या ज्ञानोद्योग उच्चमाध्यमिक विद्यालयाजवळ राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात ट्रकने मागून धडक दिल्याने त्या या अपघातात जागीच ठार झाल्या. रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी त्यांना ओळखल्याने सदरील प्रकार उघडकीस आला.

त्या येडशी येथील रहिवासी होत्या. तसेच येरमाळा येथील पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस कॉन्स्टेबल किरण सूर्यकांत शिंदे यांच्या पत्नी होत्या. ते दोघे प्राथमिक आरोग्य केंद्रातील क्वार्टरमध्ये राहत होते.

आज गावाकडे जात असताना ऐन अक्षय तुतीया सना दिवशी ही घटना घडल्याने हळ हळ व्यक्त केली जात असुन या घटनेची माहिती मिळताच येडशी गावावर शोककळा पसरली. अंजना पवार यांच्या पाश्चात पती, मुलगा, मुलगी, सासू-सासरे असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भयानक सत्य उघड! प्राणी, वृद्ध महिला आणि स्वतःच्या मुलीलाही सोडलं नाही... नसरापूर प्रकरणातील आरोपीच्या विकृत कृत्यांचा इतिहास समोर

Thane: ठाण्यात पाणीकपात लागू, पाणीपुरवठा महिन्यातून दोनवेळा बंद, कुठे आणि कधी?

टोळक्यानं भररस्त्यात गाठलं; काठी, कोयता आणि दगडाने तब्बल ३५ वार, सोलापुरात तरुणाला क्रूरपणे संपवलं, भयंकर कारण समोर

Latest Marathi News Live Update : समता पतसंस्थेच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता

Kabaddi: भारतीय नौदलाचा 'बंड्या मारुती' चषकावर कब्जा! भरत हुडा ठरला १ लाखाचा मानकरी; फायनलमध्ये यु.पी. योद्धाचा धुव्वा

SCROLL FOR NEXT