OBC Reservation Andolan Adv. Prakash Ambedkar esakal
मराठवाडा

'मराठा समाजाला कायमचं आरक्षण द्यायचं असेल, तर त्यांचं वेगळं ताट दिलं पाहिजे'; आरक्षणावर प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान

ओबीसीचं आरक्षण (OBC Reservation) ओबीसींनाच असलं पाहिजे ही भूमिका आम्ही घेणार आहोत.

सकाळ डिजिटल टीम

'संविधानावरती ओबीसींनी विश्वास ठेवला आहे. हा सर्वात मोठा आरक्षण वाचवण्याचा भाग असू शकतो, असं मला वाटतं.'

अंकुशनगर : ओबीसीचं आरक्षण (OBC Reservation) ओबीसींनाच असलं पाहिजे ही भूमिका आम्ही घेणार आहोत. सध्या तणाव निर्माण झाला असून शासनाला माझी विनंती आहे की, हा तणाव मर्यादेच्या पलीकडे जाता कामा नये, असं स्पष्ट मत अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

आमरण उपोषणाच्या आठव्या दिवशी अॅड. प्रकाश आंबेडकर (Adv. Prakash Ambedkar) यांनी आंदोलक लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांची भेट घेतली. यादरम्यान त्यांना पाणी पिण्याचा आग्रह केला, यावेळी आंबेडकरांच्या आग्रहानंतर हाके व वाघमारे यांनी पाणी पिले.

'भटक्या विमुक्तांना शाश्वत आरक्षण निघून जाते की काय याची भीती आहे. याबाबत शासनाने चर्चा केली पाहिजे. शासनाने लवकरात लवकर याकडे लक्ष घालावं. शासन लक्ष घालेलं अशी अपेक्षा करतो. राजकीय सत्ता सार्वत्रिक झाली तर समाजामधला सलोखा कायम राहतो. आमची भूमिका अगोदर जाहीर केली आहे. एखादी व्यवस्था शाश्वत झालेली आहे, त्याच्यामध्ये कोणालातरी घुसडण्याचा प्रयत्न केला, तर मग सामाजिक दृष्टीने असणारा सलोखा बिघडला जातो.'

आंबेडकर पुढे म्हणाले, 'मराठा समाजासाठी कायम आरक्षण द्यायचं असेल तर त्यांचे वेगळे ताट दिले पाहिजे. संविधानावरती ओबीसींनी विश्वास ठेवला आहे. हा सर्वात मोठा आरक्षण वाचवण्याचा भाग असू शकतो, असं मला वाटतं.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT