file photo 
मराठवाडा

झरी अंतर्गत सर्व उप केंद्रात शंभर टक्के कोव्हीडचे लसीकरण करणार- सीईओ शिवानंद टाकसाळे 

अनिल जोशी

झरी ( जिल्हा परभणी ) : औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांचे परभणी तालुक्यातील झरी या गावातील प्रा. आ. केंद्रा अंतर्गत असलेल्या सर्व उप केंद्रांमधील गावात कोव्हीडचे शंभर टक्के लसीकरण करून मराठवाड्यात प्रथम क्रमांक आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचा  निर्धार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी व्यक्त केला.

तालुक्यातील झरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात साठ वर्ष वयोगटातील नागरिकांसाठी कोव्हीड लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शिवानंद टाकसाळे यांनी कोव्हीड लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांशी विचापुस करत संवाद साधला आणि उपस्थितांना मार्गदर्शन केले पुढे बोलताना टाकसाळे म्हणाले की, कोव्हीडच्या प्रादुर्भावा पासून बचाव होण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी लस घेणे गरजेचे आहे. सदरची लस विश्वसनीय असून या बद्दल कोणीही शंका बाळगू नये. 

तसेच गावातील आशाताई, अंगणवाडी सेविका, शिक्षक आणि सर्व आरोग्य कर्मचारी यांनी गावात कुटुंब निहाय सर्व्हे करून व 100 % लसीकरण करून झरीचे नाव मराठवाड्यात पहिल्या क्रमांकावर आणण्याच्या  सूचना टाकसाळे यांनी दिल्या.

आपल्या घरातील वाड वडिलांची सेवा करणे व त्यांचे आरोग्यमान उंचावण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणे म्हणजेच ईश्वराची सेवा करण्या सारखे आहे. त्यामुळे घरातील प्रमुख व्यक्तींनी जेष्ठ मंडळींचे तात्काळ लसीकरण करून घेण्याचे आवाहन शिवानंद टाकसाळे यांनी केले तसेच सद्यपरिस्थितीत काम करत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुकही त्यांनी केले.

याप्रसंगी माजी सरपंच गजानन देशमुख, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शंकरराव देशमुख, शिक्षणाधिकारी डॉ. सूचिता पाटेकर, गट विकास अधिकारी अनुप पाटील, डॉ. राजीव सोनवणे, सरपंच दीपक देशमुख, महेश मठपती , ग्राम विकास अधिकारी आनंद खरात, वैद्यकीय अधिकारी डॉ. शिल्पा कुलकर्णी, डॉ. वर्षा कुलकर्णी, आरोग्य विभागाचे प्रसिद्धी प्रमुख सोमवंशी, स्वच्छ भारत मिशन कार्यालयातील अधिकारी, सर्व शिक्षक, आशाताई, अंगणवाडीताई, आरोग्य कर्मचारी यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वच्छ भारत मिशनचे संवाद तज्ञ ज्ञानेश्वर गायकवाड यांनी केले
1.कोरोना लस घेण्याचे नागरिकांना केले आवाहन
2.आशाताई, अंगणवाडीताई, शिक्षक, आरोग्य कर्मचाऱ्यांना दिल्या सर्वेक्षणाच्या सूचना
3.सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे केले आवाहन
4.आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाचे केले कौतुक

कोव्हीडचे लसीकरण वाढविण्यासाठी प्रत्येक विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपले मोलाचे योगदान द्यावे. तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी देखील सदरच्या लसीकरणाला प्रतिसाद नोंदवावा.

- शिवानंद टाकसाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद, परभणी.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Dam Water Level Rises : खडकवासला धरण वेगाने भरतंय... पुढचे काही तास ठरणार निर्णायक? प्रशासनाने नागरिकांना दिला महत्त्वाचा इशारा

मोठी बातमी! माध्यमिक शाळांमध्ये आता कला-क्रीडा-संगीत शिक्षकांची भरती; राज्यात यंदा १८ हजार शिक्षकांची भरती; रिक्त पदे अपलोड करायला १० जुलैपर्यंत मुदत

उजनीत ८१ हजार क्युसेकची आवक! पुण्यातील पश्चिम घाटमाथ्यावर दमदार पाऊस, 3 दिवसांत ‘प्लस’मध्ये येण्याची शक्यता; गतवर्षी धरण 27 मे रोजी प्लसमध्ये, वाचा....

Daliya Laddu Recipe:फायबरने भरपूर अन् पचायला हलके , १५ मिनिटांत तयार करा पौष्टिक दलियाचे लाडू

Pune Heavy Rain : पुणेकर त्रस्त; यंत्रणा मात्र सुस्त, आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेला उशिरा जाग

SCROLL FOR NEXT