One murder because of minor dispute Both of them in custody by the police
One murder because of minor dispute Both of them in custody by the police 
मराठवाडा

किरकोळ वादातून एकाचा खून; दोघांना घेतले पोलिसांनी ताब्यात

प्रल्हाद कांबळे

नांदेड : देगलूर नाका भागातील एका युवकाच्या डोक्यात नाकावर व पायावर लाकडाने मारून निर्घृण खून करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवार 19 नोव्हेंबरच्या पहाटे एकच्या सुमारास देगलूर नाका भागात घडली.                          

याबाबत अधिक माहिती अशी की, देगलूर नाका भागात राहणारा शेख सुलेमान आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी रुग्णालयातून घराकडे जात होता. यावेळी दोन अनोळखी युवकांनी त्याला रस्त्यात अडवून त्याच्या जवळील शंभर रुपये काढून घेतले. यातून पुढे वाद झाला. यानंतर मारेकऱ्यांनी वाद मिटविण्यासाठी आलेल्या युवकाच्या डोक्यात नाकावर लाकडाने जबर मार्ग वार केला यात गंभीर जखमी झाल्याने उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. उपस्थित नागरिकांनी मारेकऱ्यांना पकडून ठेवून पोलीस फौजदार नंदकिशोर साळुंखे यांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. रितेश-जेनेलिया देशमुखांनी बजावला मतदानाचा हक्क

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Satara Lok Sabha : साताऱ्याचा खासदार कोण होणार? उमेदवारांचे भवितव्य होणार आज यंत्रात बंद

Met Gala 2024 : बावनकशी सौंदर्य ; मेट गालाला आलियाच्या लूकने वेधलं लक्ष... 'हे' आहे तिच्या खास साडीच वैशिष्ट्य

Latest Marathi News Live Update : महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी PM मोदी आज बीड दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT