मराठवाडा

गणोरी फाट्यावर एकाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

फुलंब्री (जि.औरंगाबाद) ः फुलंब्री-औरंगाबाद रस्त्यावरील गणोरी फाट्याजवळील एका विहिरीत उडी घेऊन एकाने आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता. 18) घडली. विहिरीतील मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला. याबाबत फुलंब्री पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. एजाज खान बशीर खान पठाण (वय 52, रा. अंबरहिल, जटवाडा रोड, औरंगाबाद) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एजाज खान गॅस मेकॅनिक होते. ते बुधवारी (ता. 18) सकाळी मोटारसायकलवर गणोरी फाट्याजवळ आले. रस्त्यावरील वडाच्या झाडाजवळ मोटारसायकल उभी केली. बाजूलाच असलेल्या रामदास होळकर यांच्या विहिरीच्या काठावर मोबाईल, पायातील बूट काढून ठेवले. त्यानंतर त्यांनी विहिरीत उडी घेतली. पाण्यावर त्यांची टोपी तरंगत होती. त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांना कोणीतरी विहिरीत उडी घेतल्याचा संशय आला.

सदर विहिरीला मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने जमावाला मृतदेहाचा ठाव लागेना. अग्निशमन दलाच्या जवानांच्या अथक परिश्रमानंतर एजाज खान यांचा मृतदेह गळाला लागला. काही वेळात त्यांची ओळख पटली. त्यानंतर फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह दाखल करण्यात आला. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. पुढील तपास पोलिस नायक अंकुश बागल हे करीत आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT