beed
beed 
मराठवाडा

राफेल विमान खरेदी प्रकरणी बीडमध्ये काँग्रेसची निदर्शने

सकाळवृत्तसेवा

बीड : संरक्षण विभागाच्या खरेदीसाठी असलेल्या निकषांची पायमल्ली करत राफेल विमान खरेदीचा करार झाला आहे. मर्जीतल्या समुहाला हा करार मिळावा म्हणून हा प्रकार झाला असून यामध्ये 41 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला. 

राफेल विमान खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत याची चौकशी करण्याची मागणी करण्यासाठी बुधवारी (ता. 12) काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषदही घेतली. 537 कोटी रुपयांचे विमान 1600 कोटी रुपयांना खरेदी केल्याचा आरोप यावेळी पाटील यांनी केला. ज्या कंपनीसोबत करार केला त्या कंपनीला संरक्षण विषयक यंत्रसामुग्री बनविण्याचा पुर्वीचा कुठलाही अनुभव नाही. अनुभव असलेल्या कंपनीला डावलून केवळ 14 दिवसांपूर्वी स्थापन झालेल्या कंपनीसोबत करार केल्याचा आरोप बसवराज पाटील यांनी केला.

याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन दिल्याचे ते म्हणाले. काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांच्या सुचनेनुसार देशभर विविध जिल्ह्यांत आंदोलन करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. यावेळी माजी मंत्री सुरेश नवले, जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, माजी आमदार सिराज देशमुख, पक्षाचे जिल्हा प्रभारी भीमराव डोंगरे, महादेव धांडे, दादासाहेब मुंडे, कुंदा काळे, मिनाक्षी पांडूळे, सर्जेराव काळे, शहादेव हिंदोळे उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT