download 
मराठवाडा

कर्मचाऱ्यांच्या आई-वडिलांना आर्थिक पाठबळ देणारी संस्था 

सकाळ वृत्तसेवा

सेनगाव ः नोकरीनिमित्त कर्मचाऱ्यांना आई-वडिलांपासून इतरत्र गावी निवासी राहावे लागते. घरी राहणाऱ्या पालकांची आर्थिक सोय व्हावी, या प्रमुख उद्देशाने कोळसा येथील विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ यांनी शंभर टक्के अनुदानित कर्मचाऱ्यांच्या वेतनातील दहा टक्के रक्कम त्यांच्या आई-वडिलांच्या खात्यावर दरमहा वर्ग करण्याचा संकल्प व्यक्त केला. कर्मचाऱ्यांनी सहमती दर्शवित हा निर्णय पारदर्शकपणे पाळण्याचा निर्धार केला आहे.

शिक्षणासाठी अनेक विद्यार्थ्यांना आपल्या आई-वडील व घरापासून इतर गावी जावे लागते. अहोरात्र परिश्रम करून पालक आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी जीवाचे रान करतात. मुलांचे भवितव्य उज्ज्वल व्हावे, त्यांना चांगली नोकरी लागावी, तो स्थिर व्हावा ही इच्छा प्रत्येक पालकांची असते. नोकरी लागल्यानंतर पुन्हा कर्मचारी आई-वडिलांपासून इतरत्र निवासी राहतात. उतरत्या वयात अनेक अडचणींना पालकांना सामोरे जावे लागते. त्यांना कायमस्वरूपी आर्थिक स्त्रोत नसल्याने गैरसोय होते.

रविवारच्या बैठकीत झाली चर्चा
शहरी भागातील कर्मचाऱ्यांच्या आई-वडिलांची स्थिती फारच गंभीर असते. मुलांकडून नोकरी लागल्यावर त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केले जाते. परिणामी, वृद्ध जन्मदात्या माता-पित्यांना नाइलाजास्तव वृद्धाश्रमाचा आधार घेऊन जीवन व्यथित करण्याची वेळ येते. जर नोकरी लागल्यावर कर्मचारी मुलांच्या मासिक वेतनातून थोडीफार रक्कम पालकांना मिळाली तर त्यांची गैरसोय निश्चित टाळता, येते मात्र असे घडत नाही. कोळसा येथील विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळात रविवारी (ता.२६) प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमानंतर संस्थाध्यक्ष भास्कर बेंगाळ यांनी मार्गदर्शन केले.

कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला संकल्प
या वेळी त्‍यांनी आई-वडील मुलाचे शिक्षण व त्‍यानंतर त्‍याच्या नोकरीसाठी जिवाच रान करतात. परंतु, त्यानंतर या कर्मचाऱ्यांकडून आपल्या पालकांची सेवा करणे ही जबाबदारी पार पाडली जात नाही. असे प्रकार बहुतांशी ठिकाणी पहायला मिळतात असे सांगितले. त्‍यामुळे येथील शंभर टक्के अनुदानित शाळेतील कर्मचाऱ्यांनी पालकांचे ऋणानुबंध म्हणून आपल्या वेतनातील दहा टक्के रक्कम दरमहा आई-वडिलांच्या बँक खात्यावर जमा केली तर त्यांची सोय होईल असा संकल्प व्यक्त केला.

आर्थिक गरजेसाठी तगादा लावण्याची वेळ येणार नाही
उपस्थित कर्मचाऱ्यांनी या महत्वकांक्षी निर्णयाचे स्वागत केले. तत्काळ ही संकल्पना अंमलात आणण्यासाठी सहमती दर्शवली. ज्या कर्मचाऱ्यांना आई-वडील आहेत. त्या दोघांच्या खात्यावर प्रत्येकी पाच टक्के वेतन तर दोन्हीपैकी एकच पालक असतील तर दहा टक्के रक्कम येत्या महिन्यापासून वर्ग केली जाणार आहे. दरम्यान, संस्थाध्यक्ष श्री. बेंगाळ यांनी महत्वपूर्ण संकल्पना राबविण्याचा हा घेतलेला निर्णय वृद्ध माता-पित्यांना फार उपयोगी ठरणार आहे. भविष्यात येथील कर्मचाऱ्यांच्या आई-वडिलांना आर्थिक गरजेसाठी तगादा लावण्याची वेळ येणार नाही.


अधिवेशनात हा मुद्दा मार्गी लावण्याची मागणी
विद्याशक्ती शिक्षण प्रसारक शैक्षणिक संस्थेतील शंभर टक्के वेतन प्राप्त कर्मचाऱ्यांना दरमहा वेतनातील दहा टक्के रक्कम आई-वडिलांच्या बँक खात्यावर वर्ग करण्याचा प्रस्ताव कर्मचाऱ्यांसमोर मांडला. त्याचे सर्वांनी स्वागत केले. शासनाने असा निर्णय घटनात्मक घेतल्यास भविष्यात कर्मचाऱ्यांच्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात जावे लागणार नाही. दरम्यान, आमदार संतोष बांगर, आमदार राजू नवघरे यांची भेट घेऊन त्यांनी अधिवेशनात हा मुद्दा मार्गी लावण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे श्री. बेंगाळ यांनी सांगितले. - भास्करराव बेंगाळ, संस्थाध्यक्ष.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वाहतुकीसाठी देशात 1,800 किमी पाइपलाइन; कोणकोणत्या राज्यांतून जाणार? काय बदलणार? वाचा...

Sugar Industry: साखर कारखान्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! ४ हजार कोटींचे सॉफ्ट लोन, व्याजाचा भारही सरकार उचलणार

Eknath Shinde: चाकणमधील उद्योगांचे स्थलांतर रोखणार’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्योजकांच्या समस्यांवर घेतले महत्त्वाचे निर्णय

Maratha Reservation: जरांगेंच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळांचा मोठा दावा; म्हणाले, ‘लढाई ओबीसींविरोधात नाही, सरकारविरोधात’

US-Iran War: आम्हाला व्हेनेझुएला बनवायला निघाले होते; इराणचा ट्रम्प यांच्यावर घणाघात, राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला टोला

SCROLL FOR NEXT