duplicate notes in market 
मराठवाडा

कळंब शहरात पोलिसांनी जप्त केल्या बनावट नोटा, एकाला अटक

दिलीप गंभीरे

कळंब (उस्मानाबाद): कळंब शहरात पाचशे - दोनशे रुपयांच्या बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात कळंब पोलिसांना यश आले आहे. बनावट नोटांचे मुख्य कनेक्शन लातूर शहर असल्याचा पोलिसांना संशय असून लाखोंच्या बनावट नोटा चलनात आल्याने मोठी खळबळ माजली आहे.

पोलिसांनी शहरातील बाबनगर भागातील असरफ अली तायरअली सय्यद (वय -२५) हा बनावट नोटा बाजारात खपविताना शुक्रवार (ता.२) रात्री अटक केली आहे.याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात शहरातील चार ते पाच जणांचा समावेश असल्याच्या पोलिसांना संशय आहे दरम्यान आरोपीला शनिवार (ता.३) न्यायालयासमोर हजर केले असता,न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दोन महिन्यांपूर्वी लातूर शहरातील स्थानिक पोलिसांनी बनावट नोटांचे रॅकेट उध्वस्त केले होते. शिल्लक असलेल्या बनावट नोटा कळंब शहरात खपविण्याचा प्रकार गेल्या अनेक दिवसापासून सुरू होता, असा पोलिसांना संशय आहे. मोठ्या प्रमाणावर नव्या कोऱ्या पाचशे व दोनशे रुपयाच्या नोटा बाजारात फिरू लागल्याने अनेकांना धक्का बसला आहे. मोठ्या प्रमाणात चलन फिरू लागल्याने व्यापारी- ग्राहक संशयाने एकमेकाकडे पाहु लागले. परंतु एका व्यापाऱ्याने पोलिस निरिक्षक तानाजी दराडे यांना बनावट नोटा बाजारात चलनात आल्याचे गेल्या चार- पाच दिवसांपुर्वीच सांगितले होते.

पोलिसांनी सापळा रचून शुक्रवारी मध्यरात्री पोलिस निरिक्षक श्री दराडे, पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी राऊत, एल एस हांगे, अमोल जाधव, श्री कुवळेकर, रेखा काळे यांनी शहरातील बाबनगर भागातील असरफअली तायरअली सय्यद याला पकडण्याच्या प्रयत्न करण्यात आला. घरातून पळून जात असताना पोलिसांनी शहरात पकडले व त्याच्या घराची झाडाझडती  घेतली असता, श्री सय्यद यांच्या घरातील कचऱ्याच्या डब्ब्यात तीन नोटा ५०० रुपयाच्या व २०० रुपयाच्या पाच ड्युप्लीकेट नोटा पोलिसांनी हस्तगत केल्या.

बनावट नोटांचा बाजारात सुळसुळाट व्यापारी चिंतेत-

बनावट नोटांचे रॅकेटचे धागेदोरे शोधण्यात पोलिसांना यश आले असले तरी माञ, यातील मुख्य सुञधार माञ पोलीसांच्या हाती लागला नाही. या रॅकेटचे लातुर शी कनेक्शन असुन मुख्य आरोपीला पकडणे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे टाकले आहे.शहरात लखोंच्या ड्युप्लीकेट नोटा बाजारात फीरल्याने व्यापाऱ्यासह ग्राहक हपकले असून शहरात बनावट नोटा खपविणारे मोठे रॅकेट असल्याचा पोलिसांना संशय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: आधी शमीने धक्के दिले अन् मग नितीश रेड्डी-क्लासेनने LSG च्या गोलंदाजांना फोडलं; SRH चा १५० धावांचा टप्पा पार

२० वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनं हाताची नस कापली, मनगटावर १८ वेळा वार; का उचललं टोकाचं पाऊल

Pune Crime: पुण्यात १७ वर्षीय तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, २१ वर्षीय तरुणानं फोटो व्हायरल करण्याची दिली होती धमकी!

Jawkheda Thombre farm fire: जवखेडा ठोंबरे येथे शेतकऱ्याच्या शेडला भीषण आग; ज्वारी कडबा, भुस व औजारे जळून सुमारे ३ लाखांचे नुकसान

Latur sandalwood smuggling news: लोहा-चाकूर परिसरात भाजीपाल्याच्या कॅरेटमध्ये लपवलेले ३६.७५ लाखांचे चंदन जप्त; तिघांना अटक, ५१.९६ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

SCROLL FOR NEXT