farmer osmanabad 
मराठवाडा

घरी नसताना अज्ञाताने पेटवून दिले शेतकऱ्याचे घर; नायगावमधील घटना

वैभव पाटील

नायगाव (उस्मानाबाद) : येथील शेतकरी विश्वनाथ शंकर मस्के यांच्या शेतातील घराला अज्ञातानी पेटवून दिले आहे. यामध्ये शेतीच्या साहित्यांचे नुकसान झाले आहे. शेतातील साहित्य, ठिबक सिंचन, लसुन कांदे, पाण्याची टाकी, सिंटॅक्स, सीसीटीव्ही कॅमेरे, झोपण्यासाठी तयार केलेल्या खाटा शेतीची कागदपत्रे जळून खाक झाले आहेत.

प्रथम सीसीटीव्ही कॅमेरे फोडून आग लावली गेली त्यानंतर शेतातील घराचे दरवाजे तोडले यानंतर घरातील साहित्यांनाही आग लागून दिल्याची घटना (ता.२६) रोजी नायगाव शिवारातील गट नंबर ४९९ मधील विश्वनाथ शंकर मस्के यांच्या शेतात घडली आहे. यापूर्वीही अशा घटना या शेतकऱ्याच्या बाबतीत घडल्या आहेत. पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करूनही या जाळपोळीतील आरोपी पोलिसांना सापडले नव्हते. त्यामुळे शेतकरी विश्वनाथ मस्के यांनी आपल्या शेतातील घरासमोर तसेच इतर चारी बाजूला सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. यामुळेच तरी आरोपी सापडतील असा त्यांना विश्वास होता.

पण आरोपीने प्रथम सीसीटीव्ही कॅमेरे निकामी करून ते जाळून दिले. त्यानंतर घरातील सहित्यांना आग लावली. यामुळे घरातील सर्व शेती उपयोगी साहित्य जळाली असून यामध्ये या शेतकऱ्याचे नुकसान झालं आहे.

न्याय मागावा तरी कोणाकडे- गेल्या तीन वर्षांपासून माझ्यामागे जाळपोळीचा प्रकार लागला असून यामुळे मला मोठा आर्थिक फटका बसला आहे. यापूर्वी पोलिस स्टेशनला वारंवार तक्रार करून तसेच उपोषणाचा इशारा देऊनही गुन्हेगार सापडले नाहीत. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे शेतात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते पण त्याचाही काही फायदा झाला नाही. आता न्याय कुणाकडे मागावा अशी प्रतिक्रिया शेतकरी विश्वनाथ मस्के यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT