shivbhojan thali
shivbhojan thali shivbhojan thali
मराठवाडा

मोफत 'शिवभोजन थाळी' भागविणार गरजूंची भूक

सकाळ डिजिटल टीम

कळंब (उस्मानाबाद): कोरोना संकटाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने राज्यात कडक निर्बंध लावले आहेत. लॉकडाऊनच्या काळात गरजूंची उपासमार होऊ नये यासाठी 'शिवभोजन थाळी' मोफत देण्याची घोषणा केली होती. त्याच पार्श्वभूमीवर शहरात शिवभोजन मोफत थाळी सेंटर सुरू करण्यात आले आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत शिवभोजन थाळी सेंटर सुरू राहणार आहे. तर दररोज १२० थाळ्या गरजूंची भूक भागविणार आहे.

ठाकरे सरकारने राज्यात बुधवारपासून कडक संचारबंदी लावली आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी गुरुवार (ता.१५) पोलिस निरीक्षक तानाजी दराडे, सहायक पोलिस निरीक्षक अतुल पाटील यांच्या टीमने शहरात सकाळी फिरून संचारबंदीची माहिती नागरिकांनी दिली. कडक निर्बंधामुळे हातावर पोट असलेल्यांचे हाल होऊ नयेत, याकरीता शिवभोजन थाळी मोफत देण्याची घोषणा ठाकरे सरकारने केली आहे.

या निर्णयाचा तालुक्यातील दररोज १२० जणांना लाभ मिळणार आहे. गरिबांना कमी पैशात जेवण उपलब्ध व्हावे, याकरिता राज्य शासनाने मागच्या वर्षी हा उपक्रम सुरु केला होता. सुरुवातीला ही थाळी १० रुपयांत मिळत होती. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती व या काळात गरिबांच्या उपासमारीची शक्यता लक्षात घेऊन शिवभोजन थाळी हा उपक्रम तालुका पातळीवरही आणि मोफत राबविण्यात आला आहे.

शिवभोजन थाळी

शिवभोजन थाळी लय भारी-

कोरोना काळात शासनाने मोफत शिवभोजन थाळी उपलब्ध करून दिली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अडतीमध्ये कामगार म्हणून काम करत असून शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे. भाजी चपाती याची चव लय भारी असल्याची प्रतिक्रिया बलभीम टेळे यांनी दिली.

केंद्रावर गर्दी-

शहरात संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. अर्थात लॉकडाऊनचा पहिला दिवस असल्याने मोफत शिवभोजन थाळी घेण्यासाठी येथील केंद्रावर गर्दी होत आहे. कोरोनाचे नियम पाळत शिवभोजन थाळी वितरित करण्यात येत आहे.सकाळी ११ ते ३ वाजेपर्यत थाळी उपलब्ध करून देण्यात येत असून दररोज १२० थाळीचे उद्दिष्ट आहे.आणखीन मागणी वाढल्यास रीतसर मागणी नोंदविण्यात येणार असल्याचे केंद्रचालक अजित गुरव यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

SCROLL FOR NEXT