Sakal 
मराठवाडा

नायगाच्या गोरे दांपत्यास राज्यस्तरीय आदर्श माता-पिता पुरुस्कार

वैभव पाटील

नायगाव (उस्मानाबाद): दिवसभर शेतात राबायचे अन्‌ सायंकाळी डोक्यावर भाजीपाला घेऊन गाव आणि परिसरात विकून मुलांना शिकविणाऱ्या नायगाव (ता. कळंब) येथील गोरे दांपत्याला आदर्श माता-पिता पुरुस्कार मिळाला आहे. सुसंगत फाउंडेशन (पुणे) यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श माता-पिता पुरस्कारांने गोरे दाम्पत्याला सन्मानित करण्यात आलं आहे. येथील ज्ञानोबा गोरे  व नकुलाबाई गोरे यांना शनिवारी (ता.३० ) पुणे येथे सन्मानित करण्यात आले आहे.

नायगाव येथील ज्ञानोबा आणि नकुलबाई या दांपत्याला पहिल्यापासून मेहनतीची सवय होती. अशिक्षित असताना मेहनतीच्या जोरावर काहीतरी मिळवावे, असा ध्यास या कुटुंबाने घेतला होता. दुष्काळ, सातत्याने येणाऱ्या अडचणी यामुळे शेतीही आतबट्याची झाली होती. त्यामुळे गोरे दांपत्याने वेळप्रसंगी शेतातील कामासह भाजीपाला विक्रीचाही व्यवसाय केला. दिवसभर शेतात काम केल्यानंतर सायंकाळी डोक्यावर भाजीपाला घेऊन गाव आणि परिसरात विक्री केला. मुलांना शिक्षणाची गोडी तयार केली.

आता या दांपत्याची मुले डॉक्टर, इंजिनिअर अशा वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. अशिक्षित असताना मुलांच्या शिक्षणासाठी वाटेल ती किंमत गोरे दांपत्याने मोजली. दिवस-रात्र मेहनत केली. आपली मुले उच्चशिक्षित झाली पाहिजे हे ध्येय उराशी बाळगले होते. याच कष्टाच्या बळावर त्यांचे कुटूंब उच्चशिक्षित झाले आहे.

त्यांचा एक मुलगा उत्तम शेती करतो, दुसरा मुलगा डॉक्टर आहे.  सूनही डॉक्टर असून तिसरा शिक्षक आहे. शिवाय आता नातूही उच्चशिक्षण घेऊन डॉक्टर, इंजिनिअर बनले आहेत. मुलांना उच्चशिक्षित करून चांगले संस्कार दिले. त्यातूनच हा कायापालट झाला आहे. त्यामुळे या गोरे दांपत्याला पुणे येथील सुसंगत फाउंडेशनने सन्मानित केले आहे. 

(edited by- pramod sarawale)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT