भाटशीरपुरा : सील केलेले रस्ते.
भाटशीरपुरा : सील केलेले रस्ते.  
मराठवाडा

एक महिला पॉझिटिव्ह, भाटशिरपुरा सील

दिलीप गंभिरे

कळंब (जि. उस्मानाबाद) : मुंबईहून ट्रॅव्हल्सने लातूरला येऊन थेट तालुक्यातील भाटशिरपुरा येथे दाखल झालेल्या सात व्यक्तींपैकी एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र शासनाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून संबंधित भाग आणि भाटशिरपुरा परिसरात क्लस्टर कंटेनमेंट कृती योजना अमलात आणून संपूर्ण परिसर मंगळवारी (ता. २६) रात्री सील करण्यात आला. रुग्णाच्या संपर्कातील सात व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, आठ जूनपर्यंत भाटशिरपुरा गावाच्या सर्व सीमा बंद असणार आहेत.

मुंबई येथे असलेले सातजण ट्रॅव्हल्सने लातूर येथे २२ मे रोजी उतरले होते. हे सर्व ढोकीमार्गे भाटशिरपुरा गावात आले. कोरोनाबाधित क्षेत्रातून प्रवास झाल्याने या सर्व व्यक्तींना गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत क्वारंटाइन करण्यात आले होते. यातील एका महिलेचा स्वॅब नमुना पॉझिटिव्ह आढळून आल्याने गावकऱ्यांमध्ये धाकधूक वाढली आहे. यातच तालुक्यातील शिराढोण येथील कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील एका व्यक्तीचा अहवाल मंगळवारीच कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने तालुक्याला कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे धक्के बसू लागले आहेत.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या आता नऊ झाली असून, यात पाथर्डी व हावरगाव येथील प्रत्येकी दोन, शहरातील शिवाजीनगर भागातील एक, शिराढोण येथील तीन आणि भाटशिरपुरा येथे नव्याने आढळून आलेला एक अशी बाधितांची संख्या झाली असून, यापैकी हावरगाव येथील दोन रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान, कोरोनाबाधितांच्या संपर्कातील सर्व व्यक्तींचे स्वॅब नमुने घेण्यात आले असून, रात्री उशिरा आरोग्य पथक भाटशिरपुरा येथे दाखल होऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. 

भाटशिरपुरा येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळताच उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी केंद्र सरकारचे निर्देश केंद्रस्थानी ठेवून गावच्या सर्व सीमा लॉक करीत परिसरात क्लस्टर कंटेनमेंट कृती योजना अमलात आणण्यात आली असून, आठ जूनपर्यंत ही योजना कार्यरत राहणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajiv Gandhi : राजीव गांधींच्या हत्येबाबत इस्रायलने आधीच दिली होती सूचना, नंतर महत्त्वाचे दस्तावेज गायब; एक्स्पर्टचा दावा

CCF Tea For Thyroid : Thyroid वर मात करायची असेल तर CCF चा हेल्दी चहा प्या, नक्की फरक पडेल

Fake Deepfake's : खऱ्या किंवा एडिटेड व्हिडीओजना लावलं जातंय 'डीपफेक' चं लेबल

Lok Sabha Poll 2024 : ठाकरे गटाचा आणखी एक उमेदवार रिंगणात ? माजी महापौर रमेश म्हात्रे यांनी भरला उमेदवारी अर्ज

Jalgaon News : अपघातातील जखमीला उपचारासाठी न नेता दिले दरीत टाकून; आरोपी मालवाहू पिकप चालकास अटक

SCROLL FOR NEXT