Tulja bhavani Sakal
मराठवाडा

Osmanabad : तुळजाभवानी मातेचे सीमोल्लंघन

तुळजापूरला भक्तिमय सोहळा; हळद-कुंकवाची उधळण

सकाळ वृत्तसेवा

तुळजापूर : वाद्यांचा ठेका, हळद-कुंकवाची उधळण, देवीचा जयजयकार करीत तुळजाभवानी मातेचे बुधवारी सीमोल्लंघन उत्साहात झाले. या सोहळ्या मोठ्या प्रमाणावर भाविक सहभागी झाले होते.

देवीचा पलंग पालखीची काल रात्री मध्यरात्री बाराला शुक्रवार पेठेतून मिरवणूक सुरू झाली. अग्रभागी पोत घेतलेल्या महिला आराधीनी होत्या. किसान चौकी, साळुंके गल्ली, आर्य चौक मार्गे पहाटे साडेचारच्या पलंग पालखी मंदिरात आली. त्यानंतर अभिषेक झाल्यानंतर देवीच्या मूर्तीला १०८ साड्यांचे दिंड बांधण्यात आले. धुपारती झाली. पालखीच्या दांड्याला गाद्या बांधण्यात आल्या. पालखीमध्ये गादी, मखमली कापड ठेवण्यात आले. पहाटे पावणेसहाच्या सुमारास सीमोल्लंघन सोहळ्याला सुरवात झाली. मंदिरात हळदी- कुंकवाची उधळण, फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला. सीमोल्लंघन पारावर आल्यानंतर तुळजाभवानी मातेस साखरभात, पायसचा नैवेद्य दाखवून ओवाळणी झाली.

१० ऑक्टोबरपर्यंत निद्रा

तुळजाभवानी मातेचा सीमोल्लंघन सोहळा झाल्यानंतर देवीची मूर्ती भिंगार येथून आलेल्या पलंगावर १० ऑक्टोबरच्या पहाटेपर्यंत निद्रिस्त राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT