रांजणी (ता. कळंब) : कारखाना परिसरात बुलडाणा येथील मजूर.
रांजणी (ता. कळंब) : कारखाना परिसरात बुलडाणा येथील मजूर. 
मराठवाडा

मजुरांना माळरानावर सोडून ट्रकचालकाचे पलायन

दिलीप गंभिरे

कळंब (जि. उस्मानाबाद) : गावखेड्यातून पोटाची खळगी भरण्यासाठी गेलेले मजूर लॉकडाऊनमुळे गावाकडे निघाले आहेत; मात्र संचारबंदीमुळे मोठी अडचण झाली आहे. कोल्हापूरहून बुलडाणा जिल्ह्यातील २४ ऊसतोडणी मजुरांना घेऊन एक ट्रक रविवारी (ता. २९) अंबाजोगाईमार्गे बुलडाण्याकडे निघाला होता; मात्र सीमाबंदीमुळे पोलिस प्रशासनाच्या कारवाईच्या धास्तीने या २४ मजुरांना तालुक्यातील रांजणी येथील माळरानावर सोडून ट्रकचालकाने पलायन केल्याची माहिती समोर आली आहे. ऊसतोड मजुरांच्या जेवण व निवासाची सोय महसूल प्रशासनाने केल्याचे कळतंय.

कोरोना विषाणू या महामारी आजाराने सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. साखर कारखाने बंद झाल्याने ऊसतोडीसाठी गेलेले मजूर गावाकडे परत निघाले आहेत; मात्र लॉकडाऊनमुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. ऊसतोडीसाठी कारखान्यांकडे असलेल्या मजुरांना सोडू नये, त्यांची व्यवस्था कारखाना परिसरात करावी, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वारंवार सांगितले आहे. तरीही मजुरांचे लोंढे गावाकडे मिळेल त्या वाहनाने निघाले आहेत.

बुलडाणा जिल्ह्यातील २४ मजूर कोल्हापूर येथील साखर करखान्यांकडे ऊसतोडीसाठी गेले होते. हे सर्व मजूर एका ट्रकमधून अंबाजोगाईमार्गे बुलडाण्याकडे निघाले होते. सीमाबंदीमुळे पोलिस प्रशासनाकडून प्रत्येक वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. पोलिस कारवाईच्या भीतीमुळे ट्रकचालकाने मजुरांना रांजणी (ता. कळंब) येथील माळरानावर सोडून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मजुरांनी चालत जात कसेबसे रांजणी गाव गाठले. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या शाळेत आश्रयासाठी हे मजूर थांबले असता, त्यांना परिसरातील लोकांनी हाकलून दिले, अशी माहितीही समोर आली आहे.

दरम्यान, तहसीलदार मंजूषा लटपटे यांनी तातडीने त्या ठिकाणी भेट देऊन त्यांच्या जेवण व राहण्याची सोय करण्याच्या सूचना संबंधितांना केल्या. रास्त भाव दुकानदार ए. ए. आगरकर, उपसरपंच राजाभाऊ आगरकर, पोलिसपाटील श्रीमंत आगरकर, ग्रामसेवक श्री. चोरमले, तलाठी श्रीमती देशमुख यांच्या लक्षात ही गंभीर बाब आली. या सर्वांची आरोग्य तपासणी करून या मजुरांना घेऊन रांजणी येथील कारखाना परिसरातील शाळेत त्यांच्या मुक्कामाची आणि जेवणाची सोय करण्यात आली. 

कोरोनाच्या धास्तीने मजुराला दिले हाकलून 
रांजणी येथे हे मजूर थांबले असता, संख्या पाहून परिसरातील नागरिकांची झोप उडाली. हे जर पॉझिटिव्ह असतील तर परिसरात कोरोना विषाणूची लागण होईल, या भीतीपोटी नागरिकांनी या मजुरांना थांबण्यास विरोध केला, असे सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: कोणतेही काम करण्यापूर्वी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थानी जातो: PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT