file photo 
मराठवाडा

... अन्यथा..‘या’ कार्यालयाला टाळे ठोकू

सकाळ वृत्तसेवा

नांदेड :  उच्च न्यायालय व साखर आयुक्त यांच्या आदेशानंतरही नांदेड विभागातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना व्याजाची रक्कम दिली नाही. याबाबत कारखान्यांवर साखर सहसंचालकांनी कार्यवाही केली नाही. येत्या ता. १५ जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांना व्याजाची रक्कम मिळवून द्यावी अन्यथा शिवसेनेच्यावतीने साखर सहसंचालक कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा ऊस दर नियंत्रण मंडळाचे सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी साखर आयुक्त यांना दिला आहे.

गाळप हंगाम २०१४-१५ मध्ये नांदेड विभागातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी न देता टप्प्या-टप्प्याने दिली. त्यामुळे विलंबाने दिलेल्या एफआरपी रकमेवरील व्याज शेतकऱ्यांना मिळावे यासाठी २०१४ पासून न्यायालयीन लढा दिला. यानंतर ता. २६ जून २०१९ रोजी उच्च न्यायालयाने निर्णय देत शेतकऱ्यांना विलंब व्याज मिळावे यासाठी साखर आयुक्तांना निर्देश देवून कायदेशीर कार्यवाही करण्याचे सांगीतले होते.


ता. २५ सप्टेंबर २०१९ रोजी अंतिम निकाल दिला.
त्यानुसार साखर आयुक्तांनी वादी प्रतिवादींच्या सुनावन्या घेवून  ता. २५ सप्टेंबर २०१९ रोजी अंतिम निकाल दिला. नांदेड विभागातील कारखान्यांनी विलंब व्याज आकारणी करण्यासाठी आवश्यक सर्व माहिती तीस दिवसात प्रादेशिक सहसंचालक नांदेड यांचे कडे जमा करावी व सहसंचालकांनी निकाल लागल्याच्या तीन महिन्यात शेतकऱ्यांना विलंब व्याजाची रक्कम मिळवनू द्यावी असा आदेश केला होता.


आर्थिक देवाण-घेवाण झाली की काय अशी शंका
पण आत्तापर्यंत प्रशासनाने कारखान्यावर काहीही कार्यवाही केली नाही. उच्च न्यायालय, साखर आयुक्तांच्या आदेशानंतरही नांदेड येथील साखर सहसंचालकांनी कारखान्यावर कार्यवाही केली नाही. यात कारखानदार व प्रशासन यांच्यात काही आर्थिक देवाण-घेवाण झाली की काय अशी शंका आमच्यासह शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली काय असा प्रश्न इंगोली यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे शंका दुर करून प्रशासनाला सहकार्य न करणाऱ्या कारखान्यांची गय न करता त्यांच्यावर कठोर कार्यवाही करावी.


टाळे ठोकण्याचा इशारा शिवसेना प्रल्हाद इंगोले
येत्या ता. १५ जानेवारी पर्यंत व्याज आकारणी करून शेतकऱ्यांना व्याजाची रक्कम मिळवून दिली नाही तर शिवसेनेच्यावतीने आंदोलन करत नांदेड येथील कार्यालयाला शिवसेना व शेतकऱ्यांच्या वतीने टाळे ठोकण्याचा इशारा शिवसेना प्रल्हाद इंगोले यांनी राज्याच्या साखर आयुक्तांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी VVIP नाहीत, तातडीने सुनावणी घ्या; याचिकाकर्त्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने फटकारलं, म्हणाले...

Aditya Thackeray Shares Student Video : कोल्हापुरातील विद्यार्थ्याचा व्हिडिओ आदित्य ठाकरेंकडून शेअर; फडणवीसांना थेट सवाल, उद्धव ठाकरेंशीही फोनवरून चर्चा

Jalgaon News: तामिळनाडुचे मुख्यमंत्री विजय यांचं फेक अकाउंट, जळगाव कनेक्शन समोर; होमगार्डची चौकशी

Marathi News Live Updates : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

SCROLL FOR NEXT