file photo 
मराठवाडा

आमचा चित्रपट बरा चाललाय- अशोक चव्हाण

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : आमचं राजकीय क्षेत्र सिनेमा, नाट्य क्षेत्रापेक्षा काही वेगळं नाही. आमचा ही चित्रपट सध्या चांगला चालल्याचं वक्तव्य राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी रविवारी (ता. २६) शांभवीज अकॅडमीच्या रात्कारी झालेल्र्या कार्यक्रमात बोलताना  केेले..

मल्टीस्टारचा म्हणजेच तिन- तिन हीरोंचा सिनेमा येत आहे. तसचं आमचं चालू आहे. पुर्वी मी दोन पक्षाचं सरकार चालवलं आता तीन पक्षाचं सरकार सुरू असल्याचं वक्तव्य श्री चव्हाण यांनी केले. शांभवीज् ॲकडमीच्या वतीने आयोजित नांदेड जिल्हा वैभव पुरस्कार सोहळ्यात श्री.  चव्हाण बोलतं होते. एकंदरच चव्हाण यांनी महाविकास आघाडीच व्यवस्थित सुरु असल्याचे संकेत दिलेत. या सोहळ्यास पद्मश्री वामन केंद्रे आणि अभिनेते सचिन खेडेकर उपस्थित होते...

हल्ली मल्टीस्टारचा जमाना आहे

“राजकारण आणि चित्रपट- नाटक क्षेत्र जवळपास सारखेच आहेत. दोन्ही क्षेत्रांमध्ये सिनेमा चालेल का? सांगता येत नाही. एखादा सिनेमा चालला तर चांगलाच चालतो, अन्यथा एकदम खाली पडतो. सुदैवानं काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना असा आमचा सर्वांचा राजकीय सिनेमा सध्या चांगला चालतोय. कुणालाही वाटलं नव्हतं आम्ही एकत्र येऊ. मात्र, हल्ली मल्टीस्टारचा जमाना आहे. सिनेमात तीन- तीन हिरो पाहिजेत. त्यामुळे आम्ही तीन पक्षांचं सरकार आणलं”, असं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. 

मुख्यमंत्री म्हणून दोन पक्षांचं सरकार चालवलं

“तीन पक्षांचं सरकार म्हणजे तीन विचारांचं सरकार, हे सरकार चालणार कसं? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. दिल्लीमध्ये आमच्या ज्येष्ठ नेत्यांना भेटलो. त्यांनी परवानगी देण्यास नकार दिला. रोज भांडणं होतील. रोज प्रश्न निर्माण होतील. सरकार चालणार कसं? आम्ही सांगितलं, चिंता करु नका. मी स्वत: मुख्यमंत्री म्हणून दोन पक्षांचं सरकार चालवलं आहे. त्यात अजून एका पक्षाची भर होईल. त्यात चिंता करायचं कारण नाही’, असं अशोक चव्हाण म्हणाले. 

घटनेच्या चौकटीत सरकार चालणार

“काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आम्हाला सांगितलं की, संविधानाच्या चौकटीतच सरकार चाललं पाहीजे. संविधानाच्या चौकटीबाहेर बाहेर जायचं नाही आणि तसं झालं तर सरकारमधून बाहेर पडायचं, अशी कडक सूचना त्यांनी दिली. याबाबत संपूर्ण माहिती आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या बाहेर जाणार नाहीत. घटना हीच शिरोधार्य मानून घटनेच्या चौकटीत सरकार चालणार, अशी भूमिका घेतली.” अशी माहिती श्री चव्हाण यांनी दिली.

या मान्यवरांचा सत्कार 

विविध क्षेत्रात उतुंग भरारी घेणाऱ्या एजाज रौफ नदाफ, नंदकुमार कांबळे, रामलु पारे, शितल गायकवाड, सुरेश जलदावार, डाॅ. विलास भद्रे, साहेबराव पावडे, ईशा जैन, डाॅ. बबन जोगदंड, बाबूराव बस्वदे, अॅड. विष्णू गोडबोले, ईशा देशपांडे, व्यंकटेश चौधरी, शिवदास हमंद, मारोतराव कवळे, आणि दिपक कदम यांचा सन्मान करण्यात आला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान संपले? SRHने विजयासह GT ला अंतिम ४ मध्ये पोहोचवले; १ जागा ३ स्पर्धक...

IPL 2026 Controversy : संजू सॅमसनने विजेच्या वेगाने बेल्स उडवल्या... OUT होताच हेनरिच क्लासन खवळला, अंगावर धावला Video

Gautam Adani: अमेरिकेत गौतम अदानींचा मोठा विजय! US मधील खटला कायमचा बंद; न्याय विभागाने आरोप मागे घेतले

Pune Council Seat Battle: पुणे विधान परिषद जागेसाठी राष्ट्रवादी-भाजपमध्ये रस्सीखेच

मिस पुणे ते कॉर्पोरेट कंपनीत सिनियर मॅनेजर; लग्नानंतर ५ महिन्यात मृत्यूने खळबळ, कोण होती ट्विशा?

SCROLL FOR NEXT