Kayadhu River esakal
मराठवाडा

हिंगोलीत रात्रभर पाऊस, कयाधु नदीला आला पुर

हिंगोली जिल्ह्यात काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाचे आगमन झाले असुन शनिवार सायंकाळपासुन सुरू झालेला पाऊस रविवारी (ता.१७) सकाळी साडेसहा वाजेपर्यंत सुरू होता.

राजेश दारव्हेकर

हिंगोली : हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाचे आगमन झाले असुन शनिवार सायंकाळपासुन सुरू झालेला पाऊस रविवारी (ता.१७) सकाळी साडेसहा वाजेपर्यंत सुरू होता. या पावसामुळे शहराजवळुन वाहणारी कयाधु नदीला (Kayadhu River) पुर आला आहे. दहा वाजेपर्यंत सूर्यदर्शन देखील झाले नव्हते. जिल्ह्यात मागच्या काही दिवसापासून पावसाने उघडीप दिली होती. यामुळे सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने सोयाबीन काढणीचे खोळंबलेली कामे पाऊस थांबल्यानंतर शेतकऱ्यांनी सुरू केली होती. मात्र शनिवारी सुरू झालेल्या पावसाने काढणी केलेले सोयाबीन झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली होती. दरम्यान जिल्ह्यात शनिवारी सकाळी काही वेळ रिमझिम पाऊस झाली. दिवसभर ढगाळ वातावरण होते.

सायंकाळी साडेसहा वाजता पाऊस झाला. रात्री दहा वाजेपर्यंत रिमझिम पाऊस झाला. परत मध्यरात्रीपासून सुरू झालेला पाऊस रविवारी सकाळी साडेसहापर्यंत सुरू होता. दहा वाजेपर्यंत सुर्यदर्शन देखील झाले नाही. या पावसामुळे शहरा जवळुन वाहणारी कयाधु नदीला पुर आला आहे. हा पाऊस जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा व सेनगाव तालुक्यात सर्वदूर झाला आहे. यामुळे परत सोयाबीन काढणीची कामे खोळंबली असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026 : इशा सिंग अन् चीनच्या शाओनेचे समान ३८ गुण, तरीही भारतीय नेमबाजाला मिळाले रौप्यपदक; असं का?

Vinod Kambli Viral Video: विनोद कांबळी वृद्धाश्रमात असल्याचा व्हिडिओ व्हायरल; नेमकं काय घडलं? पत्नी अँड्रियाने केला मोठा खुलासा

Maharashtra Drought Relief : मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

Mumbai Malaria: मुंबईत मलेरियाचा वाढता धोका! रुग्णसंख्या ९ हजारांवर; वर्षभरात ४१ टक्क्यांनी वाढ

Latest Marathi News Live Update : तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय आज ‘मामा गोल्ड रिंग योजना’ सुरू करणार

SCROLL FOR NEXT