sandipan bhumre sakal
मराठवाडा

Paithan News : अतिवृष्टीची नोंद नसली तरी मदत - संदीपान भुमरे

पैठण तालुक्यांमध्ये सततच्या पावसामुळे खरिपातील सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पैठण तालुक्यांमध्ये सततच्या पावसामुळे खरिपातील सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पैठण - पैठण तालुक्यांमध्ये सततच्या पावसामुळे खरिपातील सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमधून शासनाने पैठण तालुका वगळण्यात आल्याने शेतकरी मदतीपासून वंचित राहणार असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, अतिवृष्टी नसली तरी सर्वेक्षण करून मदत देण्याचे आदेश शासनाने दिल्याने पैठण तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अतिवृष्टीतुन पैठण तालुका वगळल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या निकषानुसार मदत जाहीर करण्याची मागणी आमदार तथा पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली होती. या मागणीच्या आधारावर मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टीच्या निकषात बदल केले आहेत. तसेच या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या निकषानुसार मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

तालुक्यात सतत पडणाऱ्या परतीच्या पावसाने सोयाबीन, तूर, कापूस, मका यासह भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. तालुक्यात अतिवृष्टी झाली नसली तरी सतत कधी मुसळधार, तर कधी रिमझिम पडणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पैठण तालुक्यात मोठ्या हेक्टर क्षेत्रात सोयाबीन, तूर, मका, कापूस, यासह विविध खरीप पिकांची लागवड शेतकऱ्यांनी केली होती. सुरुवातीला पडलेल्या शेतीपूरक पावसामुळे यावर्षी खरीप पिकांचे उत्पन्न वाढणार असल्याने शेतकरीवर्ग आनंदी होता. मात्र, पीक सोंगणीसाठी आलेले असतानाच परतीच्या पावसाने मोठा फटका दिला. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आर्थिक मदतीकडे लागले होते.

पैठण तालुक्यात सततच्या पावसाने शेती पिकांचे नुकसान झाले आहे, मात्र, अतिवृष्टीची नोंद नसली तरी नुकसानीचे सर्वेक्षण तत्काळ करून विहित कार्य पद्धतीनुसार नुकसानीचे अहवाल पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहे. विशेष बाब म्हणून आवश्यक तो निधी मागणीचे प्रस्ताव स्वतंत्ररीत्या शासनाला तातडीने सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना करण्यात आली आहे. त्यामुळे मदत मिळणार आहे.

- संदीपान भुमरे, आमदार तथा पालकमंत्री.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT