City Garbage managment
City Garbage managment 
मराठवाडा

परभणी : शहरातील कचरा आता थेट प्रक्रिया केंद्रात

सकाळ वृत्तसेवा

परभणी : शहरात दररोज संकलित केला जाणारा घरगुती कचरा आता कॉम्पॅक्टरच्या माध्यमातून थेट बोरवंट येथील घनव्यवस्थापन प्रकल्पात प्रक्रियेसाठी पाठवण्याची प्रक्रिया महानगरपालिकेने सुरु केली आहे. यामुळे धाररोडवरील डंपिंग ग्राउंड बंद होण्याची शक्यता आहे.

महानगरपालिकेने घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत बोरवंड शिवारात प्रकल्प सुरु केला असून, येथे ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती, वीज निर्मिती तर सुक्या कचऱ्यावर प्रक्रीया केली जाणार आहे. शहरात दररोज सव्वाशे ते दिडशे टन घरगुती कचरा निर्माण होतो. त्यापैकी जवळपास निम्मा कचरा हा ओला असतो. या कचऱ्यावर बोरवंड येथील प्रकल्पात प्रक्रिया केली जाणार आहे.

शहरातील धाररोडवरील महानगरपालिकेच्या डंपिंग ग्राउंडवर शहरातील कचरा टाकल्या जात होता. तेथे कचऱ्याचे डोंगर निर्माण झाले होते. प्रदूषण नियंत्रण मंडळासह नागरिक हे डंपिंग ग्राउंड हटविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष करीत आहे. तसेच महापालिकेने देखील सर्वसाधारण सभेत डंपिंग ग्राउंड हटविण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, अंमलबजावणी होत नव्हती. अखेर नागरिकांच्या लढ्याला यश मिळाले. शहरातील कचरा बोरवंड येथे घेऊन जाण्याच्या निर्णयामुळे धाररोडवरील डंपिंग ग्राउंड आता बंद होणार असून, येथील कचऱ्यावर प्रक्रिया देखील सुरु असून, लवकरच भुईसपाट झालेल्या या जागेवर पालिका नविन प्रकल्प उभारण्याची शक्यता आहे.

तीन ठिकाणी कलेक्शन सेंटर

शहरात घंटागाड्या तसेच अन्य वाहनांच्या माध्यमातून संकलित होणारा कचरा बोरवंड येथे पाठवण्यासाठी महानगरपालिकेने कल्याण मंडपम् मंगल कार्यालय, जिंतूर रोड व गंगाखेड रोडवरील उड्डाणपुलाजवळ लोखंडी रॅम्प तयार केले आहेत. त्या- त्या भागातील घंटागाड्यातून थेट कचरा कॉम्पॅक्टर मध्ये भरला जाणार असून, हे कॉम्पॅक्टर बोरवंड येथील प्रकल्पावर पाठवले जात आहे. शहरातील कचरा आता धाररोडवरील डंपिंग ग्राऊंडवर न पाठवता तो बोरवंड येथे पाठवल्या जात असल्याची माहिती आयुक्त देविदास पवार यांनी दिली. महापालिकेने त्यासाठी तीन कॉम्पॅक्टर सुद्धा खरेदी केले आहेत. वर्गीकृत कचरा संकलित करण्याचे आदेश श्री. पवार यांनी स्वच्छता निरीक्षक व कंत्राटदारांनी दिले आहेत. यावेळी सहायक आयुक्त आवेज हाश्मी, मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madha Loksabha: मावळत्या सूर्याची शपथ अन् शरद पवार... मोदींची टीका; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?

Latest Marathi News Live Update : प्रज्वल रेवण्णा स्कॅंडल प्रकरणात जनता दल सेक्युलर पक्षाची मोठी कारवाई

मोहन जोशींना झाला होता मालिका सोडल्याचा पश्चाताप; जाणून घ्या शूटिंगदरम्यानचा 'तो' भन्नाट किस्सा...

Aamir Khan: "मुसलमान असल्यामुळे मला नमस्कार करण्याची सवय नव्हती पण..."; आमिरनं सांगितला पंजाबमधील 'तो' किस्सा

वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टमधील गंभीर आरोपांवर भारताचे सडेतोड उत्तर; काय करण्यात आलाय दावा?

SCROLL FOR NEXT