file photo 
मराठवाडा

परभणी : कोरोना संसर्गासोबत उन्हाचा पाराही वाढला; लॉकडाऊनमुळे सर्वांचे आर्थिक चक्र बिघडले

गणेश पांडे

परभणी ः एकीकडे कोरोना विषाणुचा संसर्गाचा वाढत जाणारा प्रसार तर दुसरीकडे वाढती उष्णता यामुळे सर्वसामान्य नागरीक हैराण झाला आहे. अश्या बिकट प्रसंगात लॉकडाऊन करण्यात आल्याने सर्वसामान्यच काय परंतू श्रीमंताचे देखील  आर्थिक चक्र बिघडले आहे.

परभणी जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार इतक्या वेगाने वाढतो आहे की दररोज जवळपास 500 रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी भरती होतांना दिसत आहेत. त्याच बरोबर मृत्युचा दरही वाढला आहे. दररोज सरासरी चार ते सहा रुग्ण दगावत असल्याने चिंतेत वाढ झाली आहे. सुरुवातीच्या काळात म्हणावा तितका प्रभावी नसलेले कोरोनाचे संक्रमण आता दुसऱ्या लाटेत मात्र भयानक रुप घेवून आले आहे. त्यामुळे अल्पावधीतच जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण साडेतीन हजाराच्याही वर पोहचले आहेत. त्यातच आता पर्यंत पावणे पाचशे जणांचा मृत्यु देखील झाला आहे. कोरोनाचा हा कहर सध्या तरी शहरी भागा पुरता असला तरी काही प्रमाणात खेडेगावातही कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने चिंतेत भर पडली आहे. ग्रामीण भागात कोरोना पसरला तर तो थांबविणे शक्य होणार नाही याची देखील प्रशासनाला चिंता आहे. त्यामुळे सोशल डिस्टसिंगच्या नियमाचे पुर्णपणे पालन करणे गरजेचे आहे. प्रत्येकाने मास्क वापरणे व सातत्याने हात धुणे हा एकमेव पर्याय सध्या तरी आहे. कोरोनाची लस देण्यास सुरुवात झाली असली तरी त्यास म्हणावा त्या प्रमाणात प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

एकीकडे कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने भयभित झालेले नागरीक आता वाढत्या उष्णतेनेही हैराण झालेले दिसत आहेत. गेल्या दोन- तीन दिवसापासून परभणी शहराचे तापमान 40 अंशावर स्थिरावलेले आहे. यात अजून वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे आगामी काळात उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता आहे. वेळीच त्याच्याही उपाययोजना लोकांना कराव्या लागणार आहेत.

लॉकडाऊनमुळे आर्थिक चक्र बिघडले

आधीची 15 दिवसाची संचारबंदी त्यानंतर राज्यशासनाच्या नविन नियमावली नुसार करण्यात आलेले अशंत: लॉकडाऊनमुळे व्यापारी, नोकरदार, कामगार व इतर हातावर पोट असणाऱ्यांचे आर्थिक चक्र बिघडले आहे. अशंत: लॉकडाऊनमध्ये भाजीपाला विक्रेते, किराणा व औषधी विक्रेत्यांना सुट दिलेली असली तरी अनेक व्यवसायीक यामुळे अडचणीत आले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

SCROLL FOR NEXT