Murder sakal
मराठवाडा

Parbhani Crime : अपघात की घातपात? सेलूत रेल्वेरुळावर मुलीचा मृतदेह आढळला

मुलीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू

विलास शिंदे

Parbhani Crime - शहरापासून काही आंतरावरील रेल्वे पटरीच्या रुळामध्ये शनिवारी (ता.०८) रोजी सकाळी साडेसहाला मुलीचा मृतदेह आढळला. सेलू पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

रवळगाव (ता.सेलू ) शिवारातील सेलू ते सातोना रेल्वे ट्रॅकवर पोल नंबर २४५/० या ठिकाणी एक मुलगी शनिवारी सकाळी धावणाऱ्या मालगाडीची धडक लागून मयत झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली. रेल्वे प्रशासनाने ही बाब सेलू ठाण्यात कळवली. त्यानंतर पोलिस निरिक्षक समाधान चवरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिसांचा घटनास्थळी पंचनामा केला.

दरम्यान, या मुलीचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालय सेलूत आणण्यात आला आहे. ओळख पटविण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे.

मयत मुलीला डोक्या व्यतिरिक्त कुठेही मार नाही. त्यामुळे हा घातपात असू शकतो का..? आणखी काही प्रकार आहे..? या दृष्टीने पोलीस माहिती घेत आहेत. कारवाई पूर्ण झाल्यानंतर माहिती दिली जाईल असे पोलिस निरिक्षक समाधान चवरे यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ताडोबातील खाण प्रकल्पाला अखेर मंजुरी; राज्य वन्यजीव मंडळातील सदस्यांचा विरोध डावलत सरकारचा निर्णय...

Kolhapur : आईच्या शेवटच्या साडीने वाचले दीड लाख; सय्यद कुटुंबाची आयुष्याची पुंजी भस्मसात, दिवसभर कचऱ्यात राबणारे हात थरथरले

Latest Marathi News Live Update : रविंद्र चव्हाणांच्या वादग्रस्त विधानाचा निषेध, बाभळगाव बंदची हाक

Amravati fire: टर्पेंटाइन पॅकिंग उद्योगात आग; एक ठार, अमरावती एमआयडीसीमधील धक्कादायक घटना, मृत महिला वर्धेची!

Hinjewadi News : हिंजवडीत संगणक अभियंत्याने आईला मेसेज करून संपविले जीवन

SCROLL FOR NEXT