file photo 
मराठवाडा

परभणी : वर्षा लहाने व आमदार मेघना साकोरे- बोर्डीकर यांच्यात तुल्यबळ लढत

विलास शिंदे

सेलू (जिल्हा परभणी)  : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक संचालक मंडळाच्या निवडणूकीत विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, संयुक्त शेती व धान्य अधिकोष सहकारी संस्था मतदार संघात राष्ट्रवादीच्या वर्षा राजेंद्र लहाने व भाजपच्या आमदार मेघना साकोरे- बोर्डीकर यांच्यात तुल्यबळ लढत होतांना दिसत आहे.

वर्षा राजेंद्र लहाने या जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र लहाने यांच्या पत्नी तर आमदार मेघना साकोरे- बोर्डीकर या माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कन्या आहेत. वर्षा लहाने आणि मेघना साकोरे- बोर्डीकर यांची परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक संचालक पदासाठी रविवार ( ता. २१ ) मार्च २०२१ रोजी तुल्यबळ लढत होत आहे.

या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काॅग्रेसचे आमदार बाबाजाणी दुर्राणी यांनी एैन वेळेस भाजपच्या उमेदवार मेघना साकोरे- बोर्डीकर यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतल्याने या निवडणूकीत चांगलीच रंगत आली आहे. या संचालक निवडणूकीसाठी सेलू मतदार संघातुन ४९ मतदार आहेत. या मतदारावरच वर्षा लहाने आणि आमदार मेघना साकोरे- बोर्डीकर यांचे राजकीय भवितव्य अवलंबुन असणार आहे.

माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर हे जिंतूर तालुक्याचे रहिवाशी आहेत. तर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र लहाने हे सेलू तालुक्याचे रहिवाशी आहेत. परंतु वर्षा राजेंद्र लहाने व आमदार मेघना साकोरे- बोर्डीकर यांच्यात होत असलेली लढत ही सेलू तालुक्यातील मतदारावरच अवलंबुन असल्याने मतदार कोणाला पसंती देणार हे येणार्‍या काळात समजणार आहे.

राष्ट्रवादीचे आमदार बाबाजाणी दुर्राणी हे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या या निवडणूकीत भाजपचे माजी आमदार बोर्डीकर यांच्या सोबत गेल्याने या निवडणूकीत बाबाजाणी दुर्राणी यांचा बोर्डीकरांना प्रत्येक्ष मतदानासाठी किती फायदा होणार हे येणार्‍या काळात समजणार असल्याची राजकिय वर्तुळात चर्चा आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Fraud: १३.१७ कोटी रुपयांची फसणूक, मुंबईत २१ वर्षीय एका तरुणाला अटक, काय आहे प्रकरण?

Baramati Vidhansabha Byelection : बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न; दिल्ली दरबारी होणार काँग्रेसचा निर्णय

Dowry Harassment Case : भाजीत केस सापडल्याने निर्दयी मारहाण, छळाला कंटाळून 25 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; 5 तोळं सोनं, 2 लाख हुंडा देऊनही पतीचं नाही झालं समाधान

Kapil Dev: फक्त IPL नव्हे, देशासाठी खेळण्याचं स्वप्न बाळगा; कपिल देवांनी तरुणांना दिला मोठा मंत्र म्हणाले...

Latest Marathi News Live Update : सिल्लोड आगारातील कर्मचाऱ्याची आत्महत्या, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT